नांदेड(प्रतिनिधी)-बेघर पत्रकारांच्या भुखंड घोटाळ्यामध्ये सन 2019 च्या लेखा परिक्षणात रोख शिल्लक 110 रुपये आहे. या ताळेबंदात 14 हजारांचा तोटा दाखवला असला तरी ताळेबंद अत्यंत काटेकोर तयार करण्यात आलेले आहे. या बेघर पत्रकारांच्या हाऊसिंग सोसायटीचे संचालक मंडळ 11 सदस्यांचे आहे. त्यातील 2019 मध्ये 9 सदस्य दाखवलेले आहेत. दोन जागा रिक्त आहेत. सन 2020 ते 2022 पर्यंतचा लेखापरिक्षण अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. या बेघरांसाठी तयार असलेल्या 36 भुखंडांमधील 35 भुखंड दिलेले आहेत. ते सर्व पत्रकारच आहे की, नाही याबद्दल माहिती प्राप्त झाली नाही. यातील कांही पत्रकार तर हाडाचे पत्रकार आहेत.
बेघर पत्रकारांच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये लेखापरिक्षणात दाखविलेली आर्थिक परिस्थिती सभासदांचे भाग 11600 सन 2017 मध्ये , 16900 सन 2018 मध्ये, 16900 सन 2019 मध्ये दाखवले आहे. सभासदांची अनामत रक्कम दरवर्षी कमी होत गेलेली आहे. ती सन 2019 मध्ये 1962 दाखवली आहे. भुखंड अनामत सन 2017 -178000 रुपये, सन 2018-183000, सन 2019-188000 अशी दाखवली आहेत. या बेघर पत्रकारांच्या हाऊसिंग सोसायटीच्या अध्यक्षाची अनामत रक्कम सन 2019 मध्ये घटून 3825 दाखवलेली आहे. लिज चार्जस सन 2017-205000 रुपये, सन 2018-210000आणि सन 2019-227000. तीन वर्षातील नफा दाखवतांना तो 600 रुपयांनी वाढला आणि दुसऱ्या वर्षात जवळपास 62 हजारांची वाढलेला आहे. नफ्यासह तोटा या लेखापरिक्षणात दाखवलेला आहे. 140056 असा आहे.
जिंदगी व येणे बाजू या सदरात रोख शिल्लक 110 रुपये दाखवली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या चालू खात्यात 1540 रुपये आहेत. मराठवाडा ग्रामीण बॅंकेच्या चालू खात्यात 86677 रुपये आहेत. रस्त्याच्या कामासाठी 17500 रुपये खर्च दाखवलेला आहे. महाराष्ट्र स्टेट कॉ.ऑप.हाऊसिंग फायनान्समध्ये रुपये 500 ची गुंतवणूक केलेली आहे.
जमा पावती पुस्तकांचे स्टॉक रजिस्टर ठेवलेले नाही. किती पावती पुस्तके वापरात आहेत याची नोंद रजिस्टरमध्ये संस्थेने ठेवलेली नाही. लेखापरिक्षण काळात संस्थेत चेअरमन अनामत जमा नावेचा व्यवहार केलेला आहे. या व्यवहारास समितीची मोघमपणे मान्यता असून अनामतीची रक्कम बॅंक भरणा करून नंतर समितीच्या मान्यतेने उचल करणे आवश्यक होते. पण असा व्यवहार झालेला नाही. याबबीकडे दुर्लक्ष झालेले आहे. किर्दीवरील अखेर शिल्लक अक्षरी नमुद करून सदरील रक्कम कोणाच्या ताब्यात आहे. या संबंधाने शेरे नमुद केलेले नाहीत. लेखा परिक्षण काळात 4 हजार रुपये न्यायालयनी खर्च आणि वकीलाची फिस 5 हजार रुपये दिलेली आहे. या रक्कमा वकीलाच्या लेटरपॅडवर दिलेल्या आहेत. विहित नमुन्यातील मुद्रांकित पावती हस्तगत केलेली नाही. संस्थेची आर्थिक स्थिती कायदा कानून व कोर्ट नियमांचे उल्लंघन समितीची कामे व्यवहार, सदरील लिखाण काम याबाबत सन 2018-19 या कालावधीदरम्यान संस्थेला क लेखा परिक्षण वर्ग प्रदान करण्यात आला आहे.
बेघर पत्रकारांच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये लेखा परिक्षणातील माहितीनुसार 31 मार्च 2019 रोजी चेअरमन-रामराव भगवानराव कुलकर्णी, सचिव- राजू रामदेव जोशी,संचालक-संजीव तुकाराम कुळकर्णी, गणेश कमलाकर कस्तुरे, प्रल्हाद गणपतराव उमाटे, अनिल हौसाजी कुपटीकर, कैलास शंकरराव नागेश्र्वर, सौ.आशा दिलीप इंगोले, देवदत्त हरी तुंगार अशी नावे आहेत. या रकान्यात 11 जागा दाखविण्यात आल्या आहेत. त्यात दोन संचालकांच्या जागा रिक्त लिहिलेल्या आहेत.
बेघर पत्रकारांच्या हाऊसिंग सोसायटीतील यादीमध्ये 36 भुखंडांपैकी 35 भुखंड दिलेले दाखविले आहेत. भुखंडधारक बेघर पत्रकार पुढील प्रमाणे आहेत. प्रभाकर नानाराव रावके, रावराव भगवानराव कुलकर्णी, देवदत्त हरी तुंगार, संजीव तुकाराम कुळकर्णी, सौ.प्रेमला सुरेश राठोड, संतोष सुखदेवराव कानगुले, सुनिता बजरंग पांढरे, राजु रामदेव जोशी, विजय विश्र्वंबर जोशी, बालाजी नागोराव इंद्राक्षे, गणेश कमलाकर कस्तुरे, प्रल्हाद गणपतराव उमाटे, अनिल हौसाजी कुपटीकर, कृष्णा चंडीदास देशमुख, गणेश हरीलाल यादव, श्रीरंग धोंडीबा मांजरमकर, श्रीकांत लक्ष्मण गायकवाड, पवन किशनराव डोके, धनंजय हरीभाऊ मांजरमकर, महम्मद ईसाद खान मन्सुरखान, प्रल्हाद उमाजी कांबळे, धोंडीराज रामचंद्र बेंबरुळे, संजय नागोराव बेंद्रीकर, एम.एस.गायकवाड, कैलास शंकरराव नागेश्र्वर, गंगाधर प्यादेकर, सौ.आशा दिलीप इंगोले, उर्मिला जनार्धन गोरे, रविरंजनकुमार रमेशप्रसादसिंग, रविंद्र रेणुराव कुळकर्णी, सौ.कावेरी रामकिशन सोळंके, वैभव बालासाहेब धानोरकर, राजर्षी शाहु सोनवणे, श्रीधर नारायणराव शेवडीकर, इमराज खान मयाद्यान खान हे सभासदत आहेत. एक भुखंड अद्याप कोणाला दिलेला नाही.
मागच्या वर्षीय पत्रकार मित्र सुरेश काशिदे यांनी 1500 रुपयाला पत्रकार कार्ड मिळते अशा स्वरुपाचे एक वृत्त प्रकाशित केले होते. ज्यामुळे असे पत्रकार ओळखपत्र ज्यांनी 1500 रुपयांना विकले होते. त्यांची पाचावर धारण बसली होती. पण सुरेश काशिदे साहेबांना बहुदा हे माहित नाही की हा धंदा लॉकडाऊनमध्येच झाला असे नाही तर या बेघरांच्या सोसायटीमध्ये झालेला आहे. खरे तर या संदर्भाची सुध्दा चौकशी महानगरपालिकेने केली पाहिजे. ती चौकशी अशी आसावी की, ज्यांच्याकडे पत्रकार म्हणून कार्ड आहेत ते कितपत सत्य आहेत. शब्दांचा पुढचा भाग आणि मागचा भाग तरी या पत्रकारांना माहित आहे काय? कारण जमीन महानगरपालिकेच्या मालकीची आहे. अर्थातच ही जागा नांदेडच्या सर्वसामान्य माणसाच्या मालकीची आहे. पण बिचाऱ्या बेघर पत्रकारांसाठी ही जागा बहाल करून उखळ पांढरे करण्यासाठी महानगरपालिकेच्या संपत्तीचा उपयोग झालेला आहे.
