ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यातील 846 फौजदारांना सहाय्यक पोलीस निरिक्षक पदी नियुक्ती

नांदेड जिल्ह्यातील 13 जाणार आणि नांदेड पोलीस परिक्षेत्रात 19 येणार
नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यातील 846 पोलीस उपनिरिक्षकांना सहाय्यक पोलीस निरिक्षक पदावर पदोन्नती देवून त्यांच्यासाठी महसुली संवर्ग वाटप केले होते. 22 मार्च 2022 रोजी पोलीस महासंचालक रजनिश सेठ यांच्या मान्यतेनंतर आस्थापना विभागाचे अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी 846नवीन पदोन्नती प्राप्त सहाय्यक पोलीस निरिक्षकांना नवीन नियुक्त्यांचे आदेश जारी केले आहेत. नांदेड जिल्ह्यातील 13 पोलीस उपनिरिक्षक बाहेर जाणार आहेत. तर राज्यातील आणि नांदेड जिल्ह्यातील असे एकूण 19 सहाय्यक पोलीस निरिक्षक नांदेड पोलीस परिक्षेत्रात येणार आहेत. सर्व पदोन्नती प्राप्त अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालक रजनिश सेठ यांनी अभिनंदन करून भविष्यातील कामकाजासाठी शुभकामना दिल्या आहेत.
राज्यात 846 पोलीस उपनिरिक्षकांना सेवा ज्येष्ठता यादीप्रमाणे पदोन्नती देण्याचे निश्चित झाले. त्यानुसार त्यांना महसुली संवर्ग वाटप सुध्दा झाले. पण प्रत्यक्षात पदोन्नती आणि नवीन नियुक्तीचे आदेश काल दि.22 मार्च रोजी निर्गमित करण्यात आले. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील 13 पोलीस उपनिरिक्षक सहाय्यक पोलीस निरिक्षक ही पदोन्नती घेवून परिक्षेत्राबाहेर जात आहेत आणि राज्यातील विविध ठिकाणाहुन एकूण 19 पोलीस उपनिरिक्षक सहाय्यक पोलीस निरिक्षक ही पदोन्नती प्राप्त करून नांदेड पोलीस परिक्षेत्रात येणार आहेत.
नांदेड जिल्ह्यातील बाहेर जाणारे पदोन्नती प्राप्त अधिकारी पुढील प्रमाणे आहेत त्यांची नवीन नियुक्ती कंसात लिहिली आहे. अमोल पंढरी पन्हाळकर, नागनाथ गुरबसप्पा सनगल्ले (कोल्हापूर परिक्षेत्र), संदीप बाबूराव थडवे, बसवेश्र्वर रामचंद्र जाकीकोेरे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), शेख जावेद शेख शब्बीर, दिपक कल्याणराव फोलाने, गोविंद विजयराव खैरे, सौमित्रा रामराव मुंडे, गणेश हरीशचंद्र होळकर, शेख नवाज शेख जमालसाब(मुंबई शहर), सुदाम मारोती मुंडे(नागपूर शहर), अनिता विठ्ठल दिनकर(नागरी हक्क संरक्षण, कोकण-2), बाबासाहेब पाराजी थोरे (दहशतवाद विरोधी पथक, कोकण-2) असे आहेत.
राज्यातून आणि नांदेड जिल्ह्यातून नांदेड पोलीस परिक्षेत्रात येणारे पदोन्नती प्रापत सहाय्यक पोलीस निरिक्षक पुढील प्रमाणे त्यांची जुनी नियुक्ती कंसात लिहिली आहे. शिवसांब सुर्यकांत घेवारे, बालाजी बाबू पुंड(हिंगोली), सुभाष गोकुळ माने, ज्ञानेदेव प्रल्हाद सानप, दत्तात्रय गंगाधर मंठाळे(बीड), सय्यद मुक्तार सय्यद जाफर (धुळे), उमेश बालाजी भोसले(यवतमाळ), पांडूरंग व्यंकट माने(उस्मानाबाद), आनंद प्रकाश माळाळे(सोलापूर शहर), दिनेश साहेबराव सुर्यवंशी(नाशिक ग्रामीण), कृष्णा भागिनाथ घायवट(अहमदनगर), सुनिल सोजर अंधारे (औरंगाबाद ग्रामीण), संजय तेजू चव्हाण(मुंबई शहर), प्रभाकर उल्हास कापुरे (पुणे शहर), मारोती उत्तमराव कारवार(नवी मुंबई), रुपाली गौतम कांबळे, प्रदीप गोपाळराव अल्लापूरकर, राम हनुमंत गिते(नांदेड), विठ्ठल किशनराव दुरपडे(मसुप नांदेड ) असे आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *