नांदेड(प्रतिनिधी)-बेघर पत्रकारांनी बनवलेल्या बेघरांच्या पत्रकार हाऊसिंग सोसायटीमध्ये 31 मार्च 2019 रोजी 1 लाख 40 हजार 65 रुपयांचा तोटा होता. हे लेखापरिक्षण अहवालात नमुद आहे. अनेक प्रतिकुल बाबी लेखापरिक्षकाने आपल्या अहवालात लिहुन सुध्दा या बेघर पत्रकारांच्या सोसायटीला क वर्ग दिला आहे. ज्या दिवशी हा लेखापरिक्ष अहवाल सादर झाला त्याची तारीखच लेखा परिक्षकांनी लिहिलेली नाही फक्त महिना लिहिलेला आहे.
नांदेड जिल्ह्यातील बेघर पत्रकारांनी नांदेडच्या नागरीकांच्या मालकीची 2 एकर जागा लाटली. या दोन एकर जागेमध्ये 36 भुखंड करण्यात आले. सोबतच त्यांची विक्री, हस्तांतरण या आधारे बेघर पत्रकारांनी करोडो रुपयांची कमाई केली. तरी सुध्दा सन 2019 च्या लेखापरिक्षण अहवालामध्ये 31 मार्च 2018 रोजी 1 लाख 40 हजार 65 रुपयंाचा तोटा बेघर पत्रकारांच्या भुखंड घोटाळ्यात असल्याची माहिती लेखा परिक्षणात नमुद आहे.
लेखापरिक्षण करण्याची एक पध्दत आहे. त्यानुसार बेघर पत्रकारांच्या सोसायटीतील सदस्यांनी एका ठरावाआधारे हे काम प्रमाणित लेखापरिक्षक एस.जी. जाधव यांना दिले. त्यामध्ये अध्यक्ष आणि सचिवाचे शिक्के मारून स्वाक्षऱ्या आहेत. पण या ठरावाचा सुचक कोण आणि अनुमोदक कोण हेच लिहिले नाही. त्यानंतर विविध परिछेदानुसार लेखापरिक्षण अहवाल तयार झाला. ज्यामध्ये लेखापरिक्षण 13 मे 2019 रोजी सुरू झाले आणि 14 मे 2019 रोजी संपले आणि 17 मे 2019 रोजी बेघरांच्या पत्रकार हाऊसिंग सोसायटीला सादर करण्यात आले. संस्थेच्या भागासाठी आलेले अर्ज अभिलेखावर नाहीत असे लिहिले आहे. भागांची एकूण खतावणी तपासणीसाठी सादर केली नाही असेही लिहिले आहे. भागांचे हस्तांतरण असा व्यवहार नाही असे लिहिले आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा पण झाली त्याची तारीख 30 सप्टेंबर 2018 अशी नमुद आहे. या बेघरांच्या सोसायटीमध्ये 7 संचालक आहेत. लेखा परिक्षण अहवाल संस्थेच्या दप्तरी दाखल आहे काय या रकाण्यात अशी व्यवस्था नाही असे लिहिलेले आहे. या संस्थेकडे एकही कर्मचारी नाही. साचलेला तोटा अधिक आहे असे नमुद आहे. लेखापरिक्षण तारखेवर किर्द अपुर्ण आहे असे लिहिलेले आहे. गुणतवणूक रोखे नाहीत असे नमुद आहे.
लेखापरिक्षणाची प्रस्तावना लिहितांना संस्थेचे लिखाण कामकाज खाजगी व्यक्तीकडून करून घेतल्याचे लिहिले आहे. पण त्या खाजगी व्यक्तीला काय मानधन दिले याचा उल्लेख लेखापरिक्षणात नाही. 31 मार्च 2019 रोजी संस्थेत 35 सभासद असून एक भुखंड शिल्लक असल्याचे लिहिले आहे. बेघर पत्रकारांची हाऊसिंग सोसायटी मनपाकडे नियमित लिज भाडे जमा करते असे लिहिले आहे. दुसऱ्या काही कागदपत्रांच्या आधारावर कसे-कसे दिले याचे वृत्त वास्तव न्युज लाईव्हने प्रकाशीत केले आहे. संस्था आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी काय करावे याच्या सुचना लिहिल्या आहेत. पण प्रत्यक्षात तसे कांही घडलेले आजपर्यंत दिसत नाही. महावार समितीच्या सभा घेण्यात आलेल्या नाहीत. समितीच्या सभेच्या नोटीसी अभिलेखावर उपलब्ध नाहीत. आर्थिक व्यवहार धनादेशाने करण्यासाठी विचारविनियम करण्यात आलेला नाही. लिज करार नाम्याचा लेप उपलब्ध नाही. त्यामुळे भुखंडांचे हस्तांतरण नियमानुसार झाले किंवा कसे हे कळत नाही असे या लेखापरिक्षणात लिहिले आहे.
36 भुखंड असतांना सन 2017 मध्ये सभासदांचे भाग 11600 होते ते 2018 आणि 2019 मध्ये वाढले नाही. सन 2017 मध्ये सभासदांची अनामत रक्कम 65962 एवढी दाखवली आहे. सन 2018 मध्ये ती रक्कम घटली 16900 झाली आणि सन 2019 मध्ये ती रक्कम 1962 झाली. तीन वर्षातला नफा वाढत गेला. तो नफा 2017 मध्ये 5130 होता, 2018 मध्ये 5730 झाला आणि 2019 मध्ये 68422 झाला. तर तोटा तीनही वर्षात 140065 रुपये कायम राहिला.
बेघर पत्रकार सोसायटीने भुखंड क्रमांक 26 गोविंद लक्ष्मण बैंगनवाडकडून सौ.कावेरी रामकिशन सोळंके यांना हस्तांतरीत केला. भुखंड क्रमंाक 11 सौ.नंदा आनंद कल्याणकर यांच्याकडून पवन किशनराव ढोकेला हस्तांतरीत केला, भुखंड क्रमंाक 14 धनंजय मारोती गुमलवाडकडून संतोष सुखदेवराव कानगुले यांना हस्तांतरीत करण्यात आला. भुखंड क्रमांक 28 माधुरी उदय देशमुखकडून उर्मिला जर्नाधन गोरे यांना हस्तांतरीत झाला. तसेच भुखंड क्रमंाक 29 जयश्री पालसाहेब चौधरीकडून रविरंजन रमेशसिंह यांना हस्तांतरीत करण्यात आला असेहे अत्यंत उत्कृष्ट लेखापरिक्षण प्राप्त झाल्यानंतर केलेला हा शब्दप्रपंच.
