नांदेड(प्रतिनिधी)-खात्रीलायक सुत्रांच्या आधारावर वास्तव न्युज लाईव्हने लिहिलेल्या बातमीला नांदेड पोलीस जनसंपर्क विभागाने प्रेसनोट काढून वास्तव न्युज लाईव्हची बातमी खरी होती. यावर शिक्कामोर्तब केला आहे. काल वसरणी भागात सापडलेल्या अनोळखी युवकाच्या प्रेताची ओळख पटली आहे. त्याचा खून करणाऱ्या तिघांना नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने पकडले आहे.
काल दुपारी 4 वाजता अनोळखी युवकाचे प्रेत जखमी आणि सडलेल्या अवस्थेत सापडले होते. वास्तव न्युज लाईव्हने तीही बातमी प्रसारीत केली होती आणि आज तो गजुलाला आहे आणि त्याचा खून झाला आहे अशी बातमी प्रसारीत केली होती. यानंतर कांही तासातच स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या पथकाने मरण पावलेला गजेंद्र उर्फ बिल्टा कैलाश ठाकूर (17) रा.सांगवी असून त्याचा खून करणारे योगेंद्र ठाकूर, सुरेंद्र ठाकूर, निलेश पेनुरकर हे असल्याचे स्पष्ट केले आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गजेंद्र उर्फ बिल्टा कैलाश ठाकूर याच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा क्रमांक 175/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 34 नुसार दाखल झाला आहे. या खून प्रकरणात चारुदत्त आणि बालाजी वाघमारे हे दोघे सुध्दा गजेंद्र उर्फ बिल्टा ठाकूरच्या खून प्रकरणातील आरोपीचे सहकारी आहेत. सध्या योगेंद्र ठाकूर, सुरेंद्र ठाकूर, निलेश पेनूरकर हे तीन मारेकरी स्थानिक गुन्हा शाखेने नांदेड ग्रामीण पोलीसांच्या स्वाधीन केले आहेत. इतर दोघांना शोध सुरू आहे.
पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग भारती, पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे, आशिष बोराटे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक श्री. गोविंदरावजी मुंडे साहेब, पोलीस अंमलदार मारोती तेलंग, संजय केंद्रे, दरशथ जांभळीकर, सखाराम नवघरे, हनमंत पोतदार, रुपेश दासरवाड, सुरेश घुगे, विठ्ठल शेळके, मोतीराम पवार, बजरंग बोडके, विलास कदम, गजानन बैनवाड, शेख कलीम, बालाजी मुंडे यांचे कौतुक केले आहे.
