लक्ष्मीबाई विश्र्वनाथ देवकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 15 मार्च रोजी रात्री 8 वाजेच्यासुमारास ते आणि त्यांचे पती दोघे मोटारसायकलवर भोकरकडे जात असतांना साईबाबा मंदिरासमोरील रस्त्यावर अज्ञात दरोडेखोराने लक्ष्मीबाई देवकरच्या हातातील पर्स बळजबरीने हिसकावून घेतली. लक्ष्मीबाई देवकर ह्या शिक्षीका आहेत. पर्समध्ये सोन्याचे गंठण, रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण 52 हजार 937 रुपयांचा ऐवज होता. अर्धापूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक कपील आगलावे अधिक तपास करीत आहेत.
शेख इरफान शेख मुक्तार अहेमद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते आपल्या ऍटोमध्ये प्रवाशी घेवून बेलत रोडकडे जात असतांना भोकर म्हैसा रस्त्यावरील पिंपळढव पुलाजवळ एका दुचाकीवर तीन दरोडेखोर आले आणि त्यांनी ऍटो थांबवून त्यांना आणि प्रवाशांना धक्काबुक्की करून त्यांच्याजवळी दोन मोबाईल आणि रोख रक्कम असा 9 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.भोकर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.