नांदेड

रविवारी कोरोनाने रुग्णांना दिली सुट्टी 

नांदेड,(प्रतिनिधी)-आज रविवारी कोरोनाने रुग्णांना सुट्टी दिली आहे.उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या आता दशक झाली आहे.उपचाराने बरे होणाऱ्या कोरोना रुग्णानांची टक्केवारी ३६.३७  आहे.
                       जिल्हा शल्यचिकित्सक  यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहिती नुसार आज दि.२० मार्च रोजी कोरोना बाधेने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आज एकही नवीन रुग्ण सापडलेला नाही.नांदेड मनपा विलगीकरणातील -०१ रुग्णाला  उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या १०००९३ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९७.३७ टक्के आहे.
            आज ४८ अहवालांमध्ये ७४५ निगेटिव्ह आणि ०० पॉसिटीव्ह आहे.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या १०२७९५ झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत ०० आणि ०० अँटीजेन तपासणीत असे एकूण ०० रुग्ण नवीन सापडले आहेत.आज स्वॅब तपासणी ०० अहवाल प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब ०३ आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ०० आहेत.
                आज कोरोनाचे १० ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण-०३, नांदेड जिल्हाच्या तालुक्यातील विलगीकरण-०७,असे उपचार सुरू आहेत
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.