बार्शी(प्रतिनिधी)-नांदेडच्या एका गडगंज श्रीमंत वकीलाने आपल्या पत्नीवर केलेल्या अन्यायाची तक्रार तब्बल एका दशकानंतर पत्नीने बार्शी जि.सोलापूर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये चार जणांची नावे असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
नांदेडमध्ये पारंपारीकरितीने गडगंज श्रीमंत असलेल्या एका युवकाने 2011 मध्ये लग्न केल्यानंतर कांही वर्ष संसार चांगला चालला नंतर वकील असलेल्या या युवकाने आपल्या पत्नीवर संशय घेण्यास सुरूवात केली. त्यातून मारहाण होणे, तिला वेगवेगळ्या प्रकारचे जाच करणे आदी प्रकार घडू लागले. जगाची जन्मदाती महिला आपल्यावर होणारे अन्याय नेहमीच दुर्लक्षीत करीत आली आहे. पण कधी तरी या अन्यायाचा उद्रेक होतो आणि त्यातूनच पुढील सर्व प्रकार घडतात. एक विचारवंत सांगतो ज्यांना नात्यांची चिंता असते ते नम्रपणे वागतात. नसता कठोरता तर प्रेतात सुध्दा असते.
या महिलेने बार्शी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत 8 जानेवारी 2022 रोजी एका हॉटेलमध्ये भोजनासाठी गेले असतांना तेथे सुध्दा तिच्यासोबत मारहाणीचा प्रकार घडला. तसेच मद्यपान करून हे वकील महाशय तिला नेहमीच मारत होते. सन 2011 मध्ये विवाह झाल्यानंतर आजपर्यंत या विवाहितेने संयम कायम राखला होता. पण घरातल्या बाथरुमसह सर्व जागी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. कांही दिवसांपुर्वी नांदेडच्या वजिराबाद पोलीसांनी मदत केल्यामुळेच ही महिला परत आपल्या आई-वडीलांकडे जावू शकली अशी माहिती सांगण्यात आली. आता मात्र तिने डोक्याला बांधले आहे आणि बार्शी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे या गुन्ह्याचा तपास बार्शी येथील महिला पोलीस उपनिरिक्षक कस्तुरे यांच्याकडे देण्यात आला आहे.
नांदेडच्या मध्यवस्तीत असलेल्या सुसंस्कृत लोकवस्तीत राहणाऱ्या आणि कायद्याचा अभ्यास करून पदवी प्राप्त करणाऱ्या व्यक्तीकडून असे घडावे याबद्दल काय जास्त लिहावे. जनतेतील इतर लोकांना मार्गदर्शन करून त्यांच्या जीवनातील काटे दुर करण्यासाठी वकीली व्यवसाय करणाऱ्या या युवकाने आपल्या पत्नीसोबत केलेले वर्तन चांगले नाहीच.