नांदेड

कोरोनात आनंदाची बातमी एकही नवीन रुग्ण सापडला नाही

नांदेड,(प्रतिनिधी)-आज 19 मार्च रोजी कोरोना विषाणूने एकही नवीन रुग्ण दिलेला नाही तसेच कोणाचाही मृत्यू कोरोना बाधेने झालेला नाही. आज कोरोना बाधेतून मुक्त होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी 97.37 आहे.
                       जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहिती नुसार आज दि.19 मार्च रोजी कोरोना बाधेने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तसेच एकही नवीन रुग्ण सापडलेला नाही. नांदेड मनपा विलगीकरणातील-01 रुग्णाला उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या  100092 झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण 97.37 टक्के आहे.
            आज  577 अहवालांमध्ये 568 निगेटिव्ह आणि 00 पॉसिटीव्ह आहे. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 102795 आहे.आज स्वॅब तपासणी 00 अहवाल प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब 09 आहेत. आज अनिर्णित राहिलेले स्वॅब 00 आहेत.
                आज कोरोनाचे 11 ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगिकरण-04, नांदेड जिल्हाच्या तालुक्यातील विलगीकरण-07,असे उपचार सुरू आहेत.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.