ताज्या बातम्या नांदेड (ग्रामीण)

सरसमजवळ कार दुचाकी अपघातात दोन ठार; दोन जखमी

नांदेड(प्रतिनिधी)-राष्ट्रीय महामार्गांवर काम सुरू असल्याने आणि अनेक जागी वळण रस्ते, जिथे रस्ते तयार झाले आहेत. तिथे अतिगती या कारणांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आज भोकर-हिमायतनगर महामार्गावर सरसम गावाजवळ एक अपघात घडला. त्यात दोन मरण पावले असून दोन जण गंभीर जखमी आहेत.
महामार्गांवरी रस्त्यांचे नवीन काम सुरू आहे. त्यामुळे अनेक जागी वळण रस्ते आहेत, कांही ठिकाणी रस्त्यांच्या कामामुळे प्रत्येक वाहन चालक खड्‌ड्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे आणि ज्या ठिकाणी महामार्गांचे काम पुर्ण झाले आहे त्या ठिकाणी अतिगतीमुळे अपघात घडत आहेत. आज सरसम (बु) गावाजवळील महादेव मंदिरासमोर दुपारी 4 वाजेच्यासुमारास एका निळ्या रंगाच्या गाडीने एका दुचाकीला जबर धडक दिली. त्यात दोघे जण मरण पावले आहेत. यावेळी घडलेल्या घटनेतील इतर दोन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात देण्यात आले आहे.
हिमायतनगर गावातील आजचा आठवड ी बाजार करून दुचाकी क्रमांक एम.एच.26 ए.एच.8461 वर बसून जाणाऱ्या केरोजी वामन हुरदुके (24) आणि गंगाधर परसराम माजळकर (30) यांना कार क्रमांक एम.एच.44 जी.1882 ने जोरदार धडक दिली. त्यात दोघांचा मृत्यू झाला. याच अपघातात गणपत प्रल्हाद वागतकर आणि दिगंबर प्रल्हाद वागतकर हे दोन भाऊ जखमी झाले. त्यांच्या सरसम येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला पाठविण्यात आले आहे. ही घटना घडल्यानंतर चार चाकी वाहन चालक पळून गेला आहे.
नवीन महामार्ग तयार होत असतांना त्यावर आता कमी वेळेत निश्चितस्थळी पोहचण्याची होड वाहनचालकांमध्ये लागली आहे. तसेच अनेक जागी अडचणी आहेत. महामार्गांचा उपयोग आपला प्रवास सुखकर होण्याऐवजी दुखकर होत चालला आहे. प्रशासनाने यावर उपाय योजना करण्याची गरज आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *