१५ जानेवारी २०२२ रोजी मौजे चिखली ता.जि.नांदेड येथील एका तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली की, चिखली येथील तलाठी सोनाली काकडे यांच्याकडे त्यांच्या वडिलोपार्जित जमीनीची नोंद वारसा हक्कात करण्यासाठी अर्ज दिला. त्यावर कार्यवाही न करता तलाठी सोनाली काकडे यांनी तक्रारदाराकडे मला आणि माझ्या वरिष्ठांना देण्याकरीता ३० हजार रुपये लाच मागणी करीत आहेत असा मजकुर होता. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने १७ जानेवारी २०२२ रोजी पंचासमक्ष लाच मागणी केल्याची बाब निष्पन्न झाली. पण त्या दिवशी त्यांनी पैसे स्विकारले नाहीत. या बाबत आता तलाठी सोनाली काकडे यांच्याविरुध्द भाग्यनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

महिला तलाठ्याने स्वत आणि वरिष्ठांसाठी ३० हजारांची लाच मागितली ; गुन्हा दाखल