नांदेड(प्रतिनिधी)-एका व्यवसायीकाला खंडणी मागण्याची धमकी देतांना खंडणीखोरांनी माझा भाऊ जेलमध्ये आहे त्याला सोडविण्यासाठी दहा लाखांची खंडणी दे असे सांगितले. पैसे दिले नाही म्हणून तक्रारदाराच्या चार चाकी गाडीवर तलवारींनी मारून त्याचे 20 हजार रुपयांचे नुकसान केले.
शहरातील गंगानगर सोसायटीमध्ये घर असलेल्या एका व्यवसायीकाला 14 मार्च रोजी रात्री 10.30 वाजता एक कॉल आला. माझा भाऊ जेलमध्ये आले आणि त्याला सोडविण्यासाठी तु 10 लाख रुपये दे नाही तर तुला जिवे मारून टाकतो. फोनवर झालेल्या या बोलन्यानंतर काही वेळाने दोन जण येथे आले आणि तेथे उभ्या असलेल्या चार चाकी वाहनावर तलवारीने ठोसे मारून 20 हजार रुपयांचे नुकसान केले. सोबतच त्यांच्या घराच्या दरवाज्यावर लाथा मारून दहशत निर्माण केली. याबाबत रामाश्रय विश्र्वनाथ सानी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन विमानतळ पोलीसांनी आकाश गोविंद लुळे (21), नागेश उर्फ नाग्या गायकवाड (22) या दोन युवकांविरुध्द गुन्हा क्रमांक 86/2022 कलम 387, 504, 506, 427, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक शेख जावेद यांच्याकडे तपास देण्यात आला आहे.
