नांदेड(प्रतिनिधी)-एका उभ्या ट्रकमधील ताडपत्री काढून त्यातील विविध बॅग, कुकर, चप्पल, बुट आणि 37 किलो सुपारी असा 69 हजार 277 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
सिध्देश्र्वर आनंदराव पिटलेवार हे ट्रक क्रमांक ए.पी.25 यु.6783 चे चालक आहेत. 15 मार्च रोजी त्यांनी रात्री 3 ते सकाळी 9 वाजेदरम्यान आपला ट्रक जिल्हा मध्यवर्ती बॅंक नवा मोंढा भोकर समोर उभी केली होती. या दरम्यान त्यांच्या ट्रकची ताडपत्री काढून कोणी तरी त्यातून विविध प्रकारचे बॅग, कुकर, चप्पल, बुट आणि 37 किलो सुपारी असा 69 हजार 277 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. भोकर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 91/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 379 नुसार दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक कराड अधिक तपास करीत आहेत.
