नांदेड(प्रतिनिधी)-महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती साजरी करण्यासाठी त्रिरत्न विहार डॉ.आंबेडकर नगरच्या सार्वजनिक भिम जयंती मंडळ अध्यक्षपदी राहुल सोनसळे यांच्या निवड करण्यात आली.
दि.12 मार्च रोजी त्रिरत्न विहारात झालेल्या एका बैठकी दरम्यान डॉ.आंबेडकर नगरमधील असंख्य लोक उपस्थित होते आणि सर्वांनी सन 2022 मध्ये महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीच्या निमत्ताने विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी आणि नवीन जयंती मंडळ कार्यकारणी निवड करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार या बैठकीत नवीन कार्यरणीची निवड करण्यात आली. मंडळातील पदाधिकारी पुढील प्रमाणे अध्यक्ष राहुल सोनसळे, उपाध्यक्ष सोनु शंकपाळ, कोषाध्यक्ष मनिष कांबळे, सुभाष कांबळे, सचिव रवि पोटफोटे, सहसचिव ऍड.अमोल सोनकांबळे यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी ईश्र्वर सावंत, नगरसेवक संदीप सोनकांबळे, मधुकर वाघमारे, समिंदर वाघमारे, अशोक पंडीत, ऍड. यशोनिल मोगले, आतिश ढगे,स्वप्नील बुक्तरे, अतुल चौदंते, दक्षक सरोदे, रुपेश सोनसळे यांच्यासह अनेक युवक उपस्थित होते. डॉ.आंबेडकर नगर भिमजयंती मंडळाची निवड झाल्यानंतर परिसरातील अनेक महिला, ज्येष्ठ पुरूष, युवक, बालकांनी राहुल सोनसळे यांचा सत्कार केला.
