नांदेड,(प्रतिनिधी)- ‘गाण्यांची अंगत-पंगत’या कार्यक्रमाच्या रसिक सदस्य आणि श्री माणिक गुमटे यांच्या सुविद्य पत्नी सौ. मधुमती गुमटे यांचे नुकतेच ह्र्दय विकाराच्या धक्क्याने दु:खद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 62 वर्षांचे होते. मालेगाव रोडवरच्या भवितव्य नगर येथे रहाणार्या मधुमती गुमटे म्हणजे गुमटे परिवार आणि सर्व नात्यांतले एक हसमुख आणि रसिक असे व्यक्तीमत्त्व होते. आजाराला व्यवस्थित तोंड देऊन त्यांची प्रकृती चांगली झालेली असताना हा दु:खद प्रसंग गुमटे परिवारावर ओढवला. सिने संगीत मधुमती यांचा आवडीचा विषय होता. गाण्यांची अंगत-पंगतच्या वतीने नुकताच साजर्या झालेल्या कार्यक्रमात त्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात त्यांनी गाण्याच्या निमित्ताने निवेदनेही केलेली होती. आपले पती माणिक गुमटे यांच्या प्रत्येक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. त्यांच्या मागे पती माणिक गुमटे, दोन कन्या सौ. रश्मी, सौ.मेघना आणि जावई कुणाल, तुषार यंदे आणि आप्तेष्ट परिवार आहे.
