नांदेड

कोरोना बातमी; दिल्लीतील एक नवीन रुग्ण दोन;सुट्टी ०१ जणांना

नांदेड,(प्रतिनिधी)-आज कोरोना विषाणूने एक नवीन रुग्ण दिला आहे.आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १ आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी ९७.३६ झाली आहे.
                       जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहिती नुसार आज दि.१४ मार्च रोजी कोरोना बाधेने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आज ०१ नवीन कोरोना रुग्ण सापडला आहे.नांदेड तालुक्यातील विलगीकरणातील-०१ रुग्णाना उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या १०००८१ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९७.३६ टक्के आहे.
            आज ५५४ अहवालांमध्ये ५५२ निगेटिव्ह आणि ०१ पॉसिटीव्ह आहे.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या १०२७८७ झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत ०१ आणि ० अँटीजेन तपासणीत असे एकूण ०१ रुग्ण नवीन सापडले आहेत.आज सापडलेला रुग्ण दिल्लीचा आहे. आज स्वॅब तपासणी ०० अहवाल प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब ०१ आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ०० आहेत.
                आज कोरोनाचे १ ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण-११, नांदेड जिल्हाच्या तालुक्यातील विलगीकरण-०३,असे उपचार सुरू आहेत
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *