नांदेड(प्रतिनिधी)-भोकर-नांदेड रस्त्यावर शेंबोली शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत एका 35 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अपघात असा भयंकर होता की, मयत व्यक्तीचे प्रेत रस्त्यावर खूप दुर घासत गेले आहे.
प्राप्त माहितीनुसार साहेबराव खंडू मेटकर रा.भोसी ता.भोकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे भाऊजी सुनिल यलप्पा पवार (35) हे सायंकाळी 7.30 वाजेच्यासुमारास शेंबोली शिवारातून महामार्गावर शेंबोली ते भोसी असे पायी चालत असतांना भोकर ते नांदेड रस्त्यावर धावणाऱ्या अज्ञात वाहनाने सुनिल पवारला जोरदार धडक दिली. त्यात सुनिल पवार धडक देणाऱ्या वाहनासह बरेच दुरपर्यंत रस्त्यावर घासत गेले. त्यामुळे त्यांचा चेहरा पुर्णपणे चिमटला आहे, पायांना जखमा झाल्या आहेत. बारड पोलीसांनी याप्रकरणी अज्ञात वाहनाप्रकरणी गुन्हा दाखल केला असून प्रभारी सहाय्यक पोलीस निरिक्षक व्ही.ए.पल्लेवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक वानोळे अधिक तपास करीत आहेत.
