नांदेड (प्रतिनिधी)- 3 लाख 50 हजार रूपयांचे साहित्य घेऊन बीडला पाठविलेली गाडी तिथे पोहचली नाही म्हणून भाग्यनगर पोलीस ठाण्यात या बाबत गुन्हा दाखल झाला आहे.
अनुज अत्तरसिंह प्रतापसिंह यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 5 वाजता तरोडा नाका येथून गाडी क्र. एम.एच. 12 के.पी. 5293 मध्ये चारचाकी वाहनांना लागणारे विविध साहित्य भरून ते बीडला टेलीकॉम सोल्युशन प्रा.लि. यांच्याकडे देण्याची जबाबदारी या गाडीला देण्यात आली. पण ही गाडी विहीतस्थळी पोहचलीच नाही. यानंतर याबाबत तक्रार देण्यात आली. या गाडीमधील साहित्यांची किंमत 3 लाख 50 हजार रूपये आहे. भाग्यनगर पोलिसांनी हा फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे यांच्याकडे देण्यात आला आहे.