ताज्या बातम्या विशेष

वॉरंट न्यायालयाने काढले, पोलीसांनी अटक केली तरी पण बातमी खोटी हा कांगावा करणाऱ्यांनी आपल्या स्वत:चे निरिक्षण करा

नांदेड(प्रतिनिधी)-गोदावरी अर्बन बॅंकेने न्यायालयात पैसे वसुलीसाठी खटला दाखल केला. त्यात सामाजिक सर्वात महत्वपूर्ण व्यक्ती गौतम जैन यांच्याविरुध्द अटक वॉरंट निघाले. 19 जानेवारी रोजी गौतम जैन यांना अटक झाली. 20 जानेवारी 2022 रोजी वास्तव न्युज लाईव्हने त्याची बातमी लिहिली आणि आज दि.12 मार्च 2022 रोजी गौतम जैन आपल्या फेसबुक पेजवर एका खोट्या बातमीमुळे आयुष्य उध्दवस्त होतो. पत्रकार बंधू विनंती असे कोणाचे पण आयुष्य उध्दवस्त करू नका मार्केट मध्ये ही बातमी वायरल झाली म्हणून कोणी व्यवार करीत नाही. असे लिहुन वास्तव न्युज लाईव्हची बातमी खोटी होती असे दाखविण्याचा असफल प्रयत्न केला आहे.
गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीकडून गौतम नरसींगदास हिरावत उर्फ जैन यांनी 7 जानेवारी 2015 रोजी 1 लाख रुपये कर्ज घेतले. 76 हजारांचा धनादेश सोसायटीला दिला. तो वटला नाही म्हणून सोसायटीने परक्राम्य संकीर्ण अभिलेख(एनआय ऍक्ट) कलम 138 प्रमाणे वाद क्रमांक 202/2018 दाखल केला. या वादात गौतम जैन हजर राहिला नाही म्हणून त्याच्याविरुध्द न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले. वजिराबाद पोलीसांनी त्यास 19 जानेवारी 2022 रोजी अटक केली. 20 जानेवारी 2022 रोजी गौतम जैनला न्यायालयात हजर करण्यात आले. ही सर्व कार्यवाही प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी नदीम मुदस्सर यांच्यासमक्ष झाली.
वास्तव न्युज लाईव्हने ही बातमी 20 जानेवारी 2022 रोजी प्रसिध्द केली. आज 13 मार्च 2022 रोजी गौतम जैनने आपल्या फेसबुक खात्यावर वास्तव न्युज लाईव्हने खोटी बातमी लिहिली आणि त्यामुळे माझे आयुष्य उध्वस्त झाले असे लिहिले. सोबतच एक बॅंक स्टेटमेंट आणि वास्तव न्युज लाईव्हची बातमी सुध्दा त्या पेजवर जोडली. गोदावरी अर्बन सोसयटी ही वास्तव न्युज लाईव्हच्या मालकीची नाही, वाद क्रमांक 202/ 2018 वास्तव न्युज लाईव्हने दाखल केला नाही. वॉरंट न्यायालयाने काढले. वजिराबाद पोलीसांनी अटक केली. त्यानंतर वास्तव न्युज लाईव्हने बातमी लिहिली मग ही बातमी खोटी कशी आमचा वाचकांना प्रश्न आहे. आता त्यांच्याशी लोक व्यवहार करत नाहीत ते कंाही वास्तव न्युज लाईव्हने लोकांना सांगितले नाही. या व्यतिरिक्त सुध्दा भरपूर कांही आहे लिहायला. तरीपण आम्ही संयम ठेवून आमच्या बातमीला खोटे म्हणणाऱ्याला समज देत आहोत. आमची बातमी खोटीच होती तर आमच्यावर कायदेशीर कार्यवाही का केली नाही ?
खात्रीलायक सुत्रांनी सांगितल्यानुसार आज महालोक अदालतीमध्ये सुध्दा सन्माननिय श्री.गौतम जैन साहेब यांनी बऱ्याच वेळ ठाण मांडला होता आणि आपल्याविरुध्द दाखल असलेला वाद क्रमांक 202/2018 संपावा पण आजही तसे कांही घडले नाही. आजही 72 हजारांचा धनादेश वटला नाही ते न्यायालयीन प्रकरण आजही सुरूच आहे. वाचकांनो कोण खोटे हे आपण ठरवा.ही आहे अगोदरची बातमी जी वाचकांसाठी आम्ही पुन्हा प्रदर्शीत करीत आहोत…

गोदावरी अर्बनचे पैसे भरले नाही म्हणून गौतम जैनला अजामीनपात्र वॉरंटवर अटक

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *