नांदेड

महिलांचे आरोग्य हिच कुटुंबांची संपत्ती – जिल्हाधिकारी डॉ. विपीन

नांदेड,(प्रतिनिधी)- जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम नांदेड रेल्वे स्थानक येथे घेण्यात आला. जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय व वेगवेगळ्या सेवाभावी संस्थांच्या समन्वयाने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, रेल्वे स्थानक येथील सफाई काम करणाऱ्या महिलांनी आपल्या आरोग्याची वेळोवेळी तपासणी करून घ्यावी. त्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव तत्पर राहील. महिलांना वेळोवेळी आरोग्य सुविधा पुरविल्या पाहिजे व महिलांच्या आरोग्यासाठी महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन महिलांच्या आरोग्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. तसेच महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन महिलांना प्रोत्साहित करून स्त्री-पुरुष समानतेवर भर देऊन महिला सक्षम झाल्या पाहिजे याबाबत ही महत्वपुर्ण मार्गदर्शन जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी केले. हा कार्यक्रम रेल्वे स्टेशन येथील व्हि.आय.पी. हॉल येथे आयोजित केला होता.

सदरील कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत जिल्हा बालसंरक्षण अधिकारी विद्या आळणे यांनी विशेष पुढाकार घेतला. रेल्वे स्थानकावरील कामगार महिला तसेच रेल्वे स्थानकावरील बालके यांच्या सुरक्षितातेसाठी सर्वांची समूहिक जबाबदारी असले बाबत श्रीमती विद्या आळणे यांनी सांगितले. या कार्यक्रमामध्ये जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नांदेड रोटरी क्लबचे पदाधिकारी, वर्ल्ड व्हिजन इंडिया , चाईल्ड लाईन , तथा रेल्वे कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. सारिका झुंजारे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. वर्ल्ड व्हिजन इंडियाचे प्रकल्प अधिकारी श्यामबाबू पट्टापू यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन महिलांना व मुलांच्या प्रगतीसाठी वर्ल्ड व्हिजन प्रत्येक क्षेत्रात हातभार लावत आहे असे संबोधित केले. रोटरी क्लबच्या डॉ. शुभांगी पाटील यांनी आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच रोटरी क्लबच्या डॉ. श्वेता अवधिया व डॉ. सुचिता भुरे यांनी महिला सुरक्षा व आरोग्य सुविधेवर मार्गदर्शन केले तसेच नांदेड चाईल्ड लाईनचे पि.डी. जोशी पाटोदेकर यांचेही मार्गदर्शन लाभले . वर्ल्ड व्हिजनने प्रकाशित केलेल्या बाल संरक्षण पुस्तकांचे लोकार्पण जिल्हा दंडाधिकारी डॉ.विपिन यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. अब्दुल रशीद शेख ,अमितकुमार गुप्ता पोलिस निरीक्षक लोहमार्ग पोलीस स्टेशन नांदेड, सुरेशजी उनवणे पोलीस निरीक्षक लोहमार्ग पोलीस स्टेशन नांदेड. डॉ. सारिका झुंजारे अध्यक्षा रोटरी क्लब ऑफ नंदीग्राम, वर्ल्ड व्हिजन इंडिया चे प्रकल्प अधिकारी श्यामबाबू पटापू ,रेल्वे सुरक्षा बलाचे अनिल कुमार तिवारी, मुख्य स्वास्थ्य निरीक्षक नवल कुमार , युनिसेफच्या पुजा यादव व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व कर्मचारी, नांदेड चाईल्ड लाईन चे कर्मचारी यांची उपस्थिती होती. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांनी सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *