

नांदेड(प्रतिनिधी)-फायनान्सचा व्यवसाय करण्यासाठी दिलेले 5 लाख रुपये परत आले नाहीत म्हणून सिडको येथील एका व्यक्तीने केलेल्या आत्महत्येप्रकरणी आता गुन्हा नोंद झाला आहे.
दि.10 जानेवारीच्या रात्री 10 ते 11 जानेवारीच्या पहाटे 7 वाजेदरम्यान एमआयडीसी जवळील एका सिमेंट कारखान्याजवळ लिंबाच्या झाडाला गळफास घेवून कृष्णा प्रल्हाद मोरे यांनी आत्महत्या केली होती. याबाबत तेंव्हा आकस्मात मृत्यू दाखल झाला होता.पण पुढे आत्महत्या करणाऱ्या कृष्णाचे बंधू भास्कर प्रल्हाद मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिवमंदिर सिडको जवळ राहणाऱ्या मोहितसिंघ बेधीला 5 लाख रुपये फायनान्सचा व्यवसाय करण्यासाठी दिले होते. तेंव्हा कृष्णा मोरेने पैसे परत मागितले तेंव्हा मोहितसिंघ बेदीनी परत दिले नाहीत. या त्रासाला कंटाळून कृष्णा मोरेने लिंबाचा झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणी 8 मार्च रोजी नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा क्रमांक 134/2022 मोहितसिंघ बेदी विरुध्द दाखल केला आहे. या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेचे 306 हे कलम जोडलेले आहे. या गुन्ह्याचा तपास तोंडी आदेशाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरिक्षक श्री अशोकरावजी घोरबांड साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक गणेश होळकर करीत आहेत.