क्राईम ताज्या बातम्या

नांदेड-मरळक रस्त्यावर सहाय्यक प्राध्यापक व त्यांच्या पत्नीला मारहाण करून लुट 

नांदेड(प्रतिनिधी)-मरळक ते नांदेड जाणाऱ्या रस्त्यावर दोन अज्ञात चोरट्यांनी एका सहाय्यक प्राध्यापकाला पत्नीसह असतांना लुटले आहे. त्यात  1 लाख रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी चोरून नेला आहे. 
                     सहाय्यक प्राध्यापक आनंद अशोक खिल्लारे आणि त्यांची पत्नी हे 8 मार्च रोजी मरळक येथील महादेव दर्शनाला गेले होते. दुपारी 12.30 वाजता ते परत येत असतांना एका लिंबाच्या झाडाखाली दोघे पती-पत्नी भोजन करण्यासाठी बसले. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात दरोडेखोरांनी त्यांना आणि त्यांच्या पत्नीला मारहाण करून पत्नीच्या अंगावरील 23 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे, 5 व 3 ग्रॅम सोन्याच्या दोन अंगठ्या असे 31 ग्रॅम सोन्याचे दागिणे ज्यांची किंमत 60 हजार रुपये आहे आणि 40 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल असा एकूण 1 लाख रुपयांचा ऐवज या दरोडेखोरांनी लुटला आहे. आनंद खिल्लारे यांच्या तक्रारीवरुन लिंबगाव पोलीसांनी दोन अज्ञात दरोडेखांराविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 392, 323 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 29/2022 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार हे  करीत आहेत. 
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.