ताज्या बातम्या महाराष्ट्र

नांदेडसह आसपासच्या जिल्ह्यातील जवळपास 50 युवक युवतींनी पोलीस उपनिरिक्षक पद प्राप्त केले

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे आभार मानले यशवंतांनी 
नांदेड(प्रतिनिधी)-नुकत्याच जाहीर झालेल्या लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत नांदेड आणि आसपासच्या जिल्ह्यांमधील एकूण 43 युवकांनी पोलीस उपनिरिक्षक पद प्राप्त केले आहे. या सर्वांनी नांदेड शहरातील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडाच्या मैदानावर आपल्या शारिरीक चाचणीची तयारी केली होती.
                   लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश संपादन करून पोलीस उपनिरिक्षक पद मिळवणारे युवक पुढील प्रमाणे आहेत. त्यांचा गुणवता यादीतील क्रमांक आणि त्यांनी प्राप्त केले गुण कंसात लिहिले आहेत. संदीप सुनिल भोसले(गुणानुक्रम 4-गुण 262), प्रेम लक्ष्मण शेळके (गुणानुक्रम 8-गुण 259), चैतन्य दत्ता घोवटे (गुणानुक्रम 26-गुण 256), अभिमन्यु प्रल्हाद धोंडे (गुणानुक्रम 37-गुण 254), राहुल भागवतराव दळवी (गुणानुक्रम 38-गुण 254), निलकंठ संग्राम गित्ते (गुणानुक्रम 39-गुण 254), अजय सुभान भोसले (गुणानुक्रम 49-गुण 253), अभिजित द्वारकादास चिखलीकर (गुणानुक्रम 59-गुण 252), रमाकांत जगन्नाथ मुंडे (गुणानुक्रम 60-गुण 252), सतिश शिवाजी तिडके (गुणानुक्रम 61-गुण 252), नामदेव विष्णु बेंबडे (गुणानुक्रम 73-गुण 251), सुरेश शिवशंकर पातोडे (गुणानुक्रम 90-गुण 250), बालाजी संदीपान माने (गुणानुक्रम 92-गुण 250), रोहन सुभाषराव जावळे (गुणानुक्रम 104-गुण 250), प्रतिक्षा सुरेश पिंपरे (गुणानुक्रम 118-गुण 250),   ज्ञानेश्र्वर मारोती एमबंडवार (गुणानुक्रम 124-गुण 248), रामेश्र्वर राजाराम जाधव (गुणानुक्रम 127-गुण 248), विश्र्वास विठ्ठलराव इसादकर (गुणानुक्रम 131-गुण 248),  सुरेश माधव तिडके (गुणानुक्रम 134-गुण 248), अमित विनोद बंडघर (गुणानुक्रम 135-गुण 248), पवन नामदेव बंडे (गुणानुक्रम 136-गुण 248),  मुजफर ईस्माईल पटेल (गुणानुक्रम 144-गुण 247), संजय लक्ष्मण फोले (गुणानुक्रम 149-गुण 247), निखिल वाघोले (गुणानुक्रम 160-गुण 246), प्रदीप बालाजी मोरे (गुणानुक्रम 166-गुण 246), सय्यद सुभानी अमिर (गुणानुक्रम 170-गुण 246),अनिल वेलव्होळ दोनरवार (गुणानुक्रम 186-गुण 245), केदार रावसाहेब उमाटे (गुणानुक्रम 191-गुण 244), सागर अशोक नळे (गुणानुक्रम 201-गुण 244), विकास प्रेमसिंघ आडे (गुणानुक्रम 226-गुण 242), मनिष मोहन मोगरे (गुणानुक्रम 238-गुण 242), सुरेश लक्ष्मण खेताल (गुणानुक्रम 278-गुण 240), गोरखनाथ चर्तभुज सुरोसे (गुणानुक्रम 279-गुण 240), सचिन साईनाथ तोटेवाड (गुणानुक्रम 325-गुण 238), रुपाली नामुनाथ निरदनार (गुणानुक्रम 411-गुण 234), निलो शंकर केंडे (गुणानुक्रम 313-गुण 234), स्वाती बालाजीराव भोजणे (गुणानुक्रम 453-गुण 232), साहेबराव अशोक पवळे (गुणानुक्रम 539-गुण 227), संदीप शंकर तुंबलवाड (गुणानुक्रम 569-गुण 225), सुप्रिया सुरेंद्र राठोड (गुणानुक्रम 698-गुण 217), राजू सायली उपापोड (गुणानुक्रम 738-गुण 215), पुनम अर्जुन खिल्लारे (गुणानुक्रम 800-गुण 211), मनिषा रमेश अवचार (गुणानुक्रम 864-गुण 205).
                    लोकसेवा परिक्षेतील यशवंत युवक आणि युवतींनी नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानावर आपल्या शारीरिक चाचणीचा अभ्यास पुर्ण केला. कोविड कालखंडा कुठलीच परवानगी नसतांना कुलगुरू डॉ.उध्दव भोसले यांनी आपले मैदान उपलब्ध करून दिले. जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी कोविड नियमावलीचे पालन करून सराव करण्याची सुचना या युवक युवतींना केली होती. कुलगुरू आणि जिल्हाधिकारी यांचे आभार यशवंत युवक युवतींनी व्यक्त  केले आहेआमच्या तयारीसाठी पुणे येथे आलेले क्रिडा शिक्षक विरेंद्र पडवळ आणि नांदेडचे एजाज अहेमद यांनी अत्यंत तांत्रिक पध्दतीने आमचा सराव करण्यासाठी केलेले मार्गदर्शन अत्यंत महत्वपूर्ण असल्याचे हे यशवंत सांगतात. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानावर सर्राव करून पोलीस उपनिरिक्षक पद प्राप्त करणाऱ्या युवक-युवतींची संख्या आता जवळपास 100 झाली असेल असे हे यशवंत सांगतात.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.