ताज्या बातम्या महाराष्ट्र

धनुर्विद्येची सुवर्णकन्या सृष्टी पाटील जोगदंडचीची सिनीअर राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड             

नांदेड,(प्रतिनिधी)- मराठवाड्यासह नांदेड च्या इतिहासात प्रथमच वरिष्ठ गटातील राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत पदक मिळवलेली नांदेडची सुवर्णकन्या कुमारी सृष्टी बालाजी पाटील जोगदंड हि प्रथमच जम्मू कश्मीर येथे आयोजीत वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघात आपले कसब दाखविणार आहे                      
                          नुकतेच दिनांक ५ ते ७ मार्च दरम्यान महाराष्ट्र आर्चरी असोसिएशनच्या व उस्मानाबाद आर्चरी असोसिएशनच्या वतीने १८ व्या सिनियर राज्यस्तर स्पर्धेचे आयोजन तुळजा भवानी स्टेडीयम उस्मानाबाद येथे करण्यात आले. त्यात नांदेडची कु. सृष्टी बालाजी पाटील जोगदंड हिने प्रथमच वरीष्ट गटामधे खेळत रौप्य पदक मिळविले. त्यांनी दिनोक २१ ते २३ मार्च दरम्यान जम्मू कश्मीर येथे आयोजीत राष्ट्रीय सिनीयर स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात आपले स्थान कायम केले.उस्मानाबाद येथील स्पर्धेत वरिष्ठ गटातील आंतरराष्ट्रीय स्पर्धकांसह  खेलो इंडिया स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंवर मात करीत 622 गुण प्राप्त करून रौप्यपदक मिळविले तिला भारतीय ऑलिम्पिक संघाचे प्रशिक्षक श्री रविशंकर सर यांचे प्रमुख मार्गदर्शन तर प्रशिक्षिका तथा नांदेडच्या महासचिव वृषाली पाटील जोगदंड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.                               
   सृष्टी बालाजी पाटील जोगदंड ही सेवादास जुनियर कॉलेज वसंत नगर मुखेड ची विद्यार्थिनी असून तिचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार किशनरावजी राठोड, संस्थेचे सचिव तथा महाविद्यालयाचे प्राचार्य गंगाधर रावजी राठोड, आमदार डॉ. तुषार राठोड ,तसेच क्रीडा विभाग प्रमुख बाबू गंधपवाड, प्राचार्य मनोहर सूर्यवंशी , राजेश इंगोले , विजय वडजे , शिरसे, डॉ. हंसराज वैद्य यांच्यासह तिच्या यशाबद्दल भारतीय तिरंदाजी महासंघाचे महासचिव प्रमोद चांदूरकर आंतरराष्ट्रीय पंच ब्रिजेश कुमार ,स्टेडियम व्यवस्थापक रमेश , सुरेश पांढरे , मालोजी कांबळे, शिवाजी पुंजरवाड , राजेद्र सुगावकर ,प्रकाश जाधव , सायकलीग संघटनेचे ज्ञानेश्वर सोनसाळे ,दिनेश उमरेकर , वैभव दमकोंद्वार, नांदेड ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष रमेश आर पारे,उपाध्यक्ष अवतारसिंग  रामगडिया ,कोषाध्यक्ष प्राध्यापक जयपाल , बाबुरावजी खंदारे ,अजहर खुरेशी श्रीनिवास भुस्सेवार, सौ स्मिता जाधव , प्रफुल डांगे सर बालाजी चेरले, लता कलवार लातूर नेताचे संपादक नेताजी , अभिजीत ( मुन्ना )कदम माजी जिल्हा क्रीडा अधिकारी गंगा लाल यादव ,अनंत , क्रीडा अधिकारी गुरु दिपसिंघ संधू क्रीडा अधिकारी किशोर पाठक, विक्रांत हाटकर , राष्ट्रपाल नरवाडे  , ओमप्रकाश आळणे,नंदकुमार घोगरे , प्रशिक्षक अतुल गोडबोले , प्राचार्य सुनिल श्रीवास्तव, संघटना सहसचिव नारायन गिरगावकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे छत्रपती पुरस्कार विजेते जनार्दन गुपिले, डॉक्टर राहुल वाघमारे , रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉक्टर विठ्ठल सिंह परिहार , जिल्हा अध्यक्ष खासदार हेमंत पाटील , राजश्रीताई , संजय चव्हाण , डॉ.अविनाश  बारगजे ,आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विजय कांबळे , प्रविण कुपटीकर, रविकुमार बकवाड, जयेश वैल्हाळ, प्रलोभ कुलकर्णी, राजेश जांभळे,डॉक्टर बालाजी जाधव , सुशिल दिक्षीत, राजेश इंगोले , डॉ.विजय वडजे , संभाजी शिरसे, डॉक्टर हंसराज वैध, विक्रांत खेडकर, डॉ. रमेश नांदेडकर. , विनोद गोस्वामी, आदिसह अनेकांनी अभिनंदन करून जम्मू कश्मीर येथील स्पर्धेतही महाराष्ट्रासाठी पदक मिळविण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *