

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील विवेकानंद भागात दोन जणांनी एका 17 वर्षीय बालकाला पिस्तुल लावून त्याच्याकडे 10 हजार रुपयांची मागणी केल्याचा प्रकार 7 मार्चच्या सायंकाळी घडला आहे.
11 वी वर्गात शिकणाऱ्या एका 17 वर्षीय बालकाने दिलेल्या तक्रारीनुसार दि.7 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता त्याच्या घरी ज्ञानेश्र्वर जाधव नावाचा व्यक्ती आला. त्याने निखिल लाला तुला बोलवत आहे असा निरोप दिला. त्यानुसार तो 17 वर्षीय बालक त्याच्या दुचाकी गाडीवर बसून घेवून जात असतांना एक जण त्याच्या पाठीमागे बसला आणि त्याच्या पाठीवर पिस्तुल लावून 10 हजार रुपयांची मागणी केली. या तक्रारीनुसार भाग्यनगर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 84/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 365, 386 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक शेख यांच्याकडे देण्यात आला.