नांदेड,(प्रतिनिधी)- आज महिला दिनी एका शिक्षकाने बालिकेचा सोबत केलेल्या दुर्व्यवहारासाठी भाग्यनगर पोलिसांनी त्यास अटक केल्या नंतर पॉक्सो न्यायालयाने त्यास एक दिवस पोलीस कोठडीत पाठवले आहे.
नांदेड शहरातील एका शिकवणी वर्गात जाणाऱ्या एका १२ वर्षीय बालिकेसोबत तेथील शिक्षकाने केलेल्या दुर्व्यव्हाराची माहिती तिच्या पालकांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात आणली.घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांनी लगेच संपूर्ण कायदेशीरपणे घटनेनेला तपासून त्वरित गुरुजी विरुद्ध पोक्सो आणि भारतीय दंड संहितेच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करून गुरुजीला गजाआड केले या गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक विशाल भोसले यांच्याकडे देण्यात आला.विशाल भोसले यांनी गुरुजी सतीश नरंगले यास पोक्सो न्यायालयात करून पोलीस कोठडी मागितली.न्यायालयाने गुरुजीला पोलीस कोठडीत पाठवले आहे.