ताज्या बातम्या नांदेड विशेष

अभिजित चिखलीकर बनले पोलीस उपनिरिक्षक ; पापा कहते है बडा नाम करेंगा बेटा हमारा…

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या पुत्राने नुकत्याच जाहीर झालेल्या लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत 252 गुण प्राप्त करून गुणवत्ता यादीत 59 वा क्रमांक मिळवला आहे. या यशामुळे अभिजित द्वारकादास चिखलीकर यांची पोलीस उपनिरिक्षक पदी सुनिश्चित झाली आहे.
लोकसेवा आयोगाने आज जाहीर केलेल्या 1041 लोकांच्या यादीत अभिजित चिखलीकरने 59 वाजता गुणवत्ता क्रमांक मिळवला आहे. त्यांनी लेखी, शारीरिक चाचणी आणि मुलाखत या तीनही प्रकारात मिळून एकूण 252 गुण प्राप्त केले आहेत. आजच्या लोकसेवा आयोगाच्या यादीप्रमाणे 497 पोलीस उपनिरिक्षकांची निवड होणार आहे. एकास 2 या गणीताप्रमाणे आयोगाने 1041 उमेदवारांची गुणानुक्रमे यादी प्रसिध्द केली आहे. अभिजित चिखलीकर यांनी एजाज यांच्या मार्गदर्शनात शारीरिक चाचणीची तयारी केली होती. अभिजित चिखलीकरांना आपल्या यशामध्ये आई-वडीलांसह एजाज सरांच्या पाठबळाला सुध्दा महत्व आहे. चिखलीकर कुटूंबियांमध्ये दुसऱ्या पिढीतील व्यक्ती पोलीस दलात आला आहे.
लोकसेवा आयोगाची परिक्षा पास झाल्यानंतर अभिजित चिखलीकर म्हणाले, मी विद्यार्थी असतांना अनेक लोकांच्या अनेक अडचणी पाहिल्या आहेत. सुदैवाने माझे वडील द्वारकादास चिखलीकर असल्यामुळे मला कोणतीही अडचण जाणवली नाही. माझ्या आई-वडीलांसाठी मी काय करेल यापेक्षा मी समाजासाठी काय करेल यावर मला भर द्यायचा आहे. माझी आई सौ.स्मिताजी आणि वडील श्री.द्वारकादासजी हे इतरांना छाया देणारे वटवृक्ष आहे. त्यांच्यासाठी मी काय करावे अशी अपेक्षाच त्यांना नाही. पण मी ज्या समाजात जन्मलो त्या समाजाची सेवा करण्यात मला लोकसेवा आयोगाच्या माध्यमाने मिळालेल्या संधीचा मी भरपूर उपयोग करणार आहे. मी अभ्यास, शारिरीक चाचणी याच्यासाठी केलेला संघर्ष मला आज मिळालेल्या विजयाची किंमत सांगतो. शारीरिक चाचणी आली त्यावेळेस माझ्या पायाला झालेली दुखापत मी विसरुन शारिरीक चाचणी दिली. त्यावेळी लोकसेवा आयोगातील अधिकारी वर्ग मला असा प्रश्न विचारत होते की, तु स्वत: वर अन्याय करतोस नाही तेंव्हा मी म्हणालो की, मी दोन वर्षापासून लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी करतो आहे. लेखी परिक्षा झाली तर शारिरीक चाचणी येण्यासाठी दीड वर्ष लागला. आणि या संधीला मी गमावले तर भविष्याचा विचार आज कसा करता येईल. माझ्या विजयात अनेकांचे आनंद सामावलेले होते आणि त्या आनंदांना लक्षात घेवून मी शारिरीक चाचणी दिली आणि यशस्वी झालो.
द्वारकादास चिखलीकर यांचे सुपूत्र अभिजित चिखलीकर यांनी लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत मिळवलेल्या यशासाठी पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधिक्षक (मुख्यालय) डॉ.अश्विनी जगताप, अर्चना पाटील, सचिन सांगळे, विक्रांत गायकवाड, डॉ.सिध्देश्र्वर भोरे, पोलीस निरिक्षक भगवान धबडगे, अरुण केंद्रे, अनिरुध्द काकडे, संजय ननवरे, विकास पाटील, अभिमन्यु साळुंके, व्ही.व्ही.गोबाडे, संतोश तांबे, मोहन भोसले, सोहन माछरे, शिवाजी डोईफोडे, माणिक बेद्रे, विष्णुकांत गुटे, सुधाकर आडे, आनंदा नरुटे, जगदीश भंडरवार, साहेबराव नरवाडे, संजय हिबारे, राखीव पोलीस निरिक्षक विजय धोंडगे आणि असंख्य पोलीस तसेच चिखलीकर मित्र परिवाराने अभिजित चिखलीकरसह चिखलीकर कुटूंबियांचे कौतुक केले आहे.
वास्तव न्युज लाईव्ह अभिजित चिखलीकर यांना भविष्यातील पोलीस दलाचे कामकाज करत असतांना आपल्याकडून निष्पाप व्यक्तीवर अन्याय होणार नाही आणि जो समाजासाठी घातक आहे अशा व्यक्तीला जेरीला आणल्याशिवाय गप्प बसणार नाहीत असेच काम करावे अशी शुभकामना दिली जात आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.