नांदेड,(प्रतिनिधी)- १४ वर्ष ७ महिने वय असणाऱ्या अल्पवयीन बालिकेला गर्भवती करणाऱ्या युवकाला कंधार येथील विशेष पॉक्सो न्यायाधीश अतुल सलगर यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठवले आहे.
लोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १४ वर्ष ७ महिने वय असलेल्या लहान बालिकेला पोट दुखत असल्याचा त्रास झाल्याने तिला तिच्या काकूने दवाखान्यात नेले.तेव्हा उपचारासाठी नांदेडला जाण्याचा सल्ला मिळाला.नांदेडच्या सरकारी रुग्णालयात तपासणी झाली तेव्हा बालिका गर्भवती असल्याचे दिसले.तेव्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या बालिकेचा गर्भ काढून टाकला.हा प्रकार बालिका आपल्या आजी आजोबांच्या घरी असतांना १० नोव्हेंबर २०२१ ते ३ डिसेंबर २०२१ दरम्यान घडला आहे.या घटनेची तक्रार ६ मार्च रोजी आली आणि लोहा पोलिसांनी गुन्हा क्रमांक ५२/२०२२ भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (२) (छ) आणि ५०६ सह बालकांचे लैंगिक अत्याचारा पासून संरक्षण अधिनियम २०१२ च्या कलम ४ आणि ६ नुसार १९ वर्षीय युवकांविरुद्ध दाखल केला.पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक रेखा काळे यांच्याकडे तपासाची जबाबदारी देण्यात आली.
लोहा पोलिसांनी अटक केलेल्या युवकास यास आज ७ मार्च रोजी न्यायालयात हजर केले आणि पोलीस कोठडीची मागणी केली.सरकारी वकील ऍड.एस.ए.पाटील यांनी सविस्तर सादरीकरण करून पोलीस कोठडी का आवश्यक आहे याबाबत मुद्दे मांडले.न्यायालयाने १९ वर्षीय युवकास दोन दिवस अर्थात ९ मार्च २०२२ पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे.