क्राईम

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडले; सरसम येथून वकीलाची तुर चोरली; मुखेड येथे एक घर आणि दुकान फोडले

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 लाख 98 हजार रुपयांची घरफोडी झाली आहे. घरफोडीचा दुसरा प्रकार सरसम ता.हिमायतनगर येथे घडला. त्यात 45 हजारांची तुर चोरण्यात आली आहे. तिसरा प्रकार नवा मोंढा मुखेड येथे एक दुकान आणि एक घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 4 हजार 740 रुपयांचा ऐवज चोरला आहे. कंधार, देगलूर आणि शहरातील शिवाजीनगर या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कै.डॉ.शंकरराव चव्हाण चौकात एका व्यक्तीचा मोबाईल लुटण्याचा प्रकार झाला आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे अंगद विठ्ठलराव केंद्रे हे आपल्या कुटूंबासह 26 फेबु्रवारी रोजी पुण्याला गेले होते. त्यांचे घर राजश्री पब्लिक स्कुलच्या शेजारी आहे. 28 फेबु्रवारी रोजी ते परत आले तेंव्हा त्यांच्या घराचे कुलूप तोडून कोणी तरी चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा एकूण 1 लाख 98 हजार 125 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या बाबत नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून गुन्हेगारांचे कर्दनकाळ पोलीस निरिक्षक श्रीमान ेअशोकरावजी घोरबांड साहेब यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश थोरात यांच्याकडे तपासाची जबाबदारी देण्यात आली आहे.
सरसम ता.हिमायतनगर येथील ऍड.सतिश संभाजी कुंटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 28 फेबु्रवारी ते 1 मार्च दरम्यान सरसम येथील त्यांच्या घरात कोणी नसल्याची संधी घेवून चोरट्यांनी ते घर फोडले आणि त्यातील 7 क्विंटल तुर किंमत 45 हजार रुपयांची चोरून नेली आहे. हिमायतनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार कागणे अधिक तपास करीत आहेत.
शिवकुमार परमेश्र्वर कैलासे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नवा मोंढा मुखेड येथे असलेले त्यांचे कृषी सेवा केंद्र हे दुकान चोरट्यांनी 28 फेबु्रवारीच्या सकाळी 8 ते 1 मार्चच्या सकाळी 7 वाजेदरम्यान फोडले. त्यांच्या दुकानातील रोख रक्कम 1 लाख 8 हजार रुपये आणि शेजारच्या घरातून 96 हजार 740 रुपये रोख रक्कम चोरली आहे. या दोन्ही चोऱ्यांमध्ये एकूण 2 लाख 4 हजार 740 रुपयांची रोकड लंपास झाली आहे. मुखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक जी.डी.काळे यांच्याकडे देण्यात आला आहे.
कंधार येथून शेख गुडूसाब रहेमान साब यांची दुचाकी गाडी क्रमांक 26 ए.जे.4461 ही 30 हजार रुपये किंमतीची गाडी चोरीला गेली आहे. धोंडे हॉस्पीटल शिवाजीनगर येथून मन्मथ केशवराव नरडेले यांची 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.एक्स.4977 चोरीला गेली आहे. शारदानगर देगलूर येथून गजानन खंडू गायकवाड यांची 50 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.वाय.0239 चोरीला गेली आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.