क्राईम

कुंडलवाडी पोलीसांनी अत्यंत कमी वेळेत दोन खूनांचा उलगडा केला 

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे हुनगुंदा येथे काम करणाऱ्या राजस्थान येथील वडील आणि त्याचा मुलगा अशा दोघांना गायब करून त्यांचा खून करून प्रेताची व्हिलेवाट लावणाऱ्या मध्यप्रदेशातील पाच जणांना नांदेड पोलीसांनी पकडून आणले आणि दोन्ही प्रेत शोधून काढले. अत्यंत कमी वेळेत नांदेड जिल्हा पोलीस दलाने ही कार्यवाही पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे आणि तपासीक अंमलदार पोलीस उपअधिक्षक विक्रांत गायकवाड यांच्या तपास कसबातील कौशल्य वापरून पुर्ण केली आहे. 
                               दि.21 फेबु्रवारी रोजी हुनगुंदा येथे हल्लर घेवून आलेले कांही मजुर काम करत होते. त्यात कांही राजस्थानचे आणि काही मध्यप्रदेशातील होते. 27 फेब्रुवारी  रोजी रुदार खॉ झडमल खॉ रा.राजस्थान यांनी तक्रार दिली की, हरभरा पिक काढण्यासाठी दरवर्षीप्रमाणे त्याचा काका रशीद खॉ त्यांचा मुलगा अजमत खॉ यांच्यासोबतचे पाच मजुर, त्यांच्या सोबतचा ट्रॅक्टर, हल्लर आणि एक मोटारसायकल दिसून आली नाही. हा घटनाक्रम 21 फेब्रुवारी रोजीचा आहे. कुंडलवाडी पोलीसांनी रुदार खॉच्या तक्रारीवरुन त्यांचा काका रशीद खॉ आणि रहिद खॉचा मुलगा अजमद खॉ रा.पलासपाणी तहसील भिमपुरा जि.बैतुल (मध्यप्रदेश) येथील पाच जणांविरुध्द पळवून नेल्या प्रकरणी गुन्हा क्रमाक 25/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 364 आणि 34 नुसार दाखल केला. 
                   या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधिक्षक विक्रांत गायकवाड यांच्याकडे देण्यात आला. घडलेल्या प्रकाराची माहिती आपले वरिष्ठ अधिकारी यांना देवून पोलीस पथक मध्यप्रदेश राज्यात गेले आणि तेथून प्रमोद रमेश सुर्वे (18), बंटी निजाम सलामे (23) , विनोद चुन्नु सलामे (19) आणि सोबत दोन विधीसंघर्षग्रस्त बालक अश्या ५ जणांना कुंडलवाडी येथे आणले. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजुर केली. पोलीस कोठडीच्या तपासादरम्यान पोलीसांनी एक प्रेत कुंडलवाडी जवळी चन्नापुर शेत शिवारातून आणि दुसरे प्रेत यवतमाळ जिल्ह्यातील पोफाळी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या नागवाडी शेतशिवारातून कुजलेल्या अवस्थेत शोधले. या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेचे कलम 302, 201 वाढविण्यात आले. 
                     ही सर्व तपास प्रक्रिया पुर्ण करण्यात पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक विक्रांत गायकवाड,स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, धर्माबादचे पोलीस निरिक्षक संजय हिबारे, बिलोलीचे शिवाजी डोईफोडे, कुंडलवाडीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक करीम खान पठाण, पोलीस उपनिरिक्षक व्ही.पी.सुर्यवंशी, अनिल सनगले, पोलीस अंमलदार तैनात बेग, कदम, रेनके, शितळे, माकुरवार, चौहाण, जाधव, नजीर, गंधकवाड, बेग, कांबळे, कमलाकर आदींनी मेहनत घेतली. 
24 तासात 6 खून 
आजच वास्तव न्युज लाईव्हने जिल्ह्यातील पाच खूनांचे वृत्त प्रकाशीत केले. कुंडलवाडी पोलीसांनी आणखी एक प्रेत शोधून ही खूनाची संख्या 6 झाली असल्याचे दिसते. जिल्ह्यात 24 तासात 6 खून घडले आहेत. 
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.