ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात दोन 41 वन संरक्षकांच्या नवीन नियुक्त्या; नांदेडला केशव वाबळे

नांदेड(प्रतिनिधी)-राज्याच्या महसुल व वन विभागाने राज्यातील 2 अपर प्रधान मुख्य वन संरक्षक, 5 मुख्य वन संरक्षक, 8 वन संरक्षक आणि 26 उपसंरक्षक अशा एकूण 41 अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. महसुल व वनविभागाचे अवर सचिव संजीव राणे यांची या शासन आदेशावर स्वाक्षरी आहे. नांदेडचे उप वनसंरक्षक आर.ए.सातेलीकर यांनी दिर्घकाल रजा घेतल्यामुळे त्यांच्या जागी नांदेड येथे केशव वाबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील महसुल व वनविभागाने 41 अधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या केल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक-पी.कल्याणकुमार (अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक माहिती तंत्रज्ञान धोरण नागपूर), डॉ.व्ही.क्लेमंट बेन(अपर प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव पश्चिम मुंबई), मुख्य वनसंरक्षक-आर.प्रविण (मुख्य वन संरक्षक प्रादेशीक पुणे), आर.मणिकंदा रामानुजम(मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक कोल्हापुर), प्रकाश लोणकर (मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक चंद्रपूर), एस.एम.गुजर (मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक औरंगाबाद), आर.एम.नाईकडे (मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक नागपुर), वनसंरक्षक – जी.के.अनारसे(वनसंरक्षक प्रादेशिक अमरावती), एस.रमेशकुमार (वनसंरक्षक सामाजिक वनीकरण नागपुर), श्रीमती श्रीलक्ष्मी अनाबथुला(वनसंरक्षक व क्षेत्र संचालक पेंच व्याघ ्रप्रकल्प), जी.पी.नरवने(सहसचिव वने व महसुल मंत्रालय मुंबई), व्ही.जे.भिसे (वनसंरक्षक कार्यआयोजन नागपूर), सी.एल.धुमाळ (वनसंरक्षक संशोधन पुणे), व्ही.जी. घुले(वन संरक्षक प्रादेशिक यवतमाळ), एच.जी. धुमाळ(वनसंरक्षक सामाजिक वनीकरण पुणे), उप वनसंरक्षक- गजेंद्र हिरे (उप वनसंरक्षक नाशिक), तुषार चव्हाण (उप वनसंरक्षण वन्यजीव पुणे), जयरामे गौडा आर(उप वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया), केशव वाभळे(उप वनसंरक्षक प्रादेशिक नांदेड), श्रीमती पुनम पाटे (उप वनसंरक्षक प्रादेशिक सिरोंचा), सुमितकुमार (विभागीय व्यवस्थापक महाराष्ट्र वन विकास महामंडळ बल्लारशाह आगार), डॉ.कुमार स्वामी एस.आर (उप वनसंरक्षक मानव संसाधन व्यवस्थापन नागपुर), उमेश वावरे (उप वनसंरक्षक प्रादेशिक पुर्व नाशिक), संतोष सस्ते (उप वनसंरक्षक प्रादेशिक ठाणे), शेख साईपुन (उप वनसंरक्षक प्रादेशिक भुमिअभिलेख पणवेल), प्रमोदकुमार पंचभाई (विभागीय वन अधिकारी वन्यजीव बोर अभयारण्य नागपुर), कुमारी सरोज गवस (उप वनसंरक्षक कार्यआयोजन ठाणे), सचिन रेपाळ (उप वनसंरक्षक प्रादेशिक शहापुर), राहुल गवई (उप वनसंरक्षक प्रादेशिक भंडारा), निता कट्टे (उप वनसंरक्षक कार्यआयोजन कोल्हापुर), लक्ष्मण पाटील (उप वनसंरक्षक प्रादेशिक मेसावी), शैलेंद्रकुमार जाधव (प्राध्यापक प्रशासन व व्यवस्थापन कुंडलविभाग प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधीनी (वने) कुंडल), अमोल सातपुते (उप वनसंरक्षक प्रादेशिक जुन्नर), दिवाकर निरंजन (उप वनसंरक्षक प्रादेशिक जव्हार), निलेश दत्त शर्मा (विभागीय वन अधिकारी प्रादेशिक चंद्रपुर), आनंद रेड्डी येल्लू (उप वनसंरक्षक प्रादेशिक यवतमाळ), श्रीमती मधुमिता एस. (उप वनसंरक्षक प्रादेशिक डहाणू), प्रविण एस.(विभागीय व्यवस्थापक महाराष्ट्र वनविकास महामंडळ नाशीक), राहुलसिंग तोलीया (उप वनसंरक्षक प्रादेशिक आलापल्ली), पवन जेफ (उप संचालक नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र साकोली), श्रीमती श्वेता बोधु(विभागीय व्यवस्थापक महाराष्ट्र वन विकास महामंडळ यवतमाळ) असे आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.