नांदेड(प्रतिनिधी)-आज पौष अमावस्या म्हणजे महाशिवरात्री पर्व. आज असंख्य महादेव भक्तांनी एक मिरवणूक काढून आपला जल्लोष व्यक्त केला. सायंकाळी सोमेश कॉलनीमध्ये श्री महादेव आणि आई पार्वती यांचा विवाह सोहळा समर्थ मंदिरात साजरा होणार आहे.
मागील दोन वर्षांपासून धार्मिक कार्यक्रमांना बंदी होती. आजही कांही नियमांसह धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. याला अनुसरून आज देवाधीदेव महादेव यांची पालखी, महादेवाची प्रतिमा घेवून असंख्य शिवभक्तांनी जुना मोंढा भागातून वाजत गाज मिरवणूक काढली. भोलेनाथ की जय हो… या घोषणा देत ही मिरवणूक स्वामी समर्थ मंदिर सोमेश कॉलनी येथे पोहचली. या ठिकाणी रात्री भगवान श्री महादेव आणि आई पार्वती यांचा विवाह सोहळा पार पाडला जाणार आहे.
