नांदेड(प्रतिनिधी)-अतिरिक्त कार्यभार देवून पोलीस महासंचालक पदावर कार्यरत असलेल्या संजय पांडे यांना एका रिट याचिकेमुळे काढावे लागले. संजय पांडे मुळात महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक होते. आता त्यांना मुंबई पोलीस आयुक्त या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.
28 फेबु्रवारी रोजी महाराष्ट्र राज्याच्या गृहविभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांच्या डिजिटल स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या शासन आदेशानुसार संजय पांडे यांना पोलीस आयुक्त ब्रहणमुंबई या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. मुंबईचे सध्याचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई येथे नियुक्ती देण्यात आली आहे. राज्य शासनाने आपला हा शासन निर्णय संकेतांक 202202281546495629 नुसार राज्य शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे.
