नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड तालुक्यालगत असणाऱ्या तालुक्याच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवता शिकवता प्राध्यापकाने एका विदेशी महिलेसोबत व्हिडीओ चित्रीकरणावर केलेले अश्लिल कृत्य व्हायरल झाल्यानंतर आता गुरूजींकडून भविष्यातील पिडीचा होणारा सत्यानाश पाहुन काय लिहावे यासाठी शब्दच सापडत नाहीत.
एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये एक नांदेड जिल्ह्यातील प्राध्यापक आपल्या नैसर्गिक आवस्थतेत दिसतात आणि दुसऱ्या बाजूला एक विदेशी महिला दिसते. महिला विदेशी आहे की, नाही याचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कोणतीही प्रक्रिया उपलब्ध नसल्यामुळे ते 100 टक्के सांगता येणार नाही. पण या 36 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये गुरूजी आणि त्या महिलेचे कृत्य पाहुन त्याला अश्लिता या शब्दाशिवाय दुसरा कोणताही शब्द आम्हाला शब्दकोषात सापडला नाही. इंग्रजी शिकवता-शिकवता गुरूजींनी केलेले हे कृत्य अत्यंत दुर्देवी, घाणेरडेच आहे.
खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरूजींच्या या कृत्यानंतर ही महिला नांदेड जिल्ह्यात पण आली होती म्हणे. त्यावेळी भरपूर कांही देवाण-घेवाण झाली. त्या देवाण-घेवाणीतून कोणी कोणाला काय दिले हे लिहिण्याची गरज नाही. पण अत्यंत मोठ्या व्यक्तीच्या महाविद्यालयात कार्यरत या इंग्रजीच्या गुरूजीने केलेले हे कृत्य माहित झाल्यानंतर सुध्दा त्यांचे काही बिघडले मात्र नाही. प्रश्न हा आहे अशी वृत्ती घेवून जगणाऱ्या शिक्षकांकडून भविष्यातील पिढ्या बरबाद झाल्याशिवाय राहणार नाहीत हे मात्र नक्की.
गुरूजींचे हे कृत्य महाविद्यालयाच्या संचालकांना सुध्दा माहित आहे. याबद्दलचा तो व्हिडीओ पाहिल्यावर लाज येण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. याही पेक्षा मोठी बाब म्हणजे एका मोठ्या समाजातील महासंघाचे ते गुरूजी नेता आहेत. गुरूजी, नेते मंडळी असे करतील तर समाजातील लोकांनी त्यातून काय घ्यावे. हा व्हिडीओ त्या महिलेने व्हायरल केला आहे असे दिसते. तेंव्हा आपल्या पाल्यांना निती शिकवणाऱ्या शिक्षकांनी असे कांही कृत्य करण्याअगोदर स्वत:च्या नितीचा विचार केला नाही याचे दुर्देव वाटते.
