ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात 13 पोलीस निरिक्षकांना पोलीस उपअधिक्षक/ सहाय्यक पोलीस आयुक्त पदी पदोन्नत्या

नांदेड,(प्रतिनिधी)- राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या सेवा जेष्ठता यादीनुसार राज्याच्या गृह विभागाने १४ पोलीस निरीक्षकांना पोलीस उप अधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त पदावर बढती दिली आहे.या आदेशावर गृह विभागाचे सचिव व्यंकटेश भट यांची डिजिटल स्वाक्षरी आहे.
                         सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या विशेष अनुमान याचिकेच्या आदेश आणि त्यात होणारा न्यायनिर्णय यास अधीन राहून महाराष्ट्र शासनाने राज्यातील निवड जेष्ठता यादीत असणाऱ्या १४ पोलीस निरीक्षकांना बढती देऊन तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती दिली आहे.या पदोन्नतीमुळे नियमाधीनतेचा कोणताही सेवा जेष्ठता हक्क मिळणार नाही असे आदेशात लिहिलेले आहे.
                          पोलीस उप अधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त अशी पदोन्नती प्राप्त प्राप्त करणारे पोलीस निरीक्षक आणि त्यांची नवीन नियुतीची जागा पुढील प्रमाणे आहे.अजय सुभाष चांदखेडे – उप विभागीय अधिकारी सावनेर उप विभाग नागपूर ग्रामीण,कवयत्री किसन गावित – सहायक पोलीस आयुक्त ठाणे शहर,जितेंद्र आत्माराम आगरकर – उप विभागीय अधिकारी सावनेर उप विभाग गणेशपुरी ठाणे ग्रामीण,मिलिंद दासराव वाघमारे – सहायक पोलीस आयुक्त नवी मुंबई,मुकुंद बंकटराव आघाव – उप विभागीय अधिकारी सावनेर उप विभाग कन्नड औरंगाबाद ग्रामीण,देविदास काशिनाथ शेळके – पोलीस उप अधीक्षक मुख्यालय जालना,अनिल रामदास दबडे – सहायक पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड,अतुलकुमार यशवंतराव नवगिरे – उप विभागीय अधिकारी सावनेर उप विभाग अचलपूर अमरावती ग्रामीण,दीपक सदाशिव चौधरी – सहायक पोलीस आयुक्त बृहन्मुंबई,अंगद ज्ञानोबा सुडके – पोलीस उप अधीक्षक मुख्यालय लातूर,धनंजय महादेव येरुळे – अपर उप आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई,गजानन रामचंद्र कंकाळे – पोलीस उप अधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण,अजयकुमार छगनलाल मालवीय – सहायक पोलीस आयुक्त नवी मुंबई,उदय वसंतराव डुबल – अपर पोलीस अधीक्षक गृहने अन्वेषण विभाग पुणे असे आहेत. हा पदोन्नती आदेश महाराष्ट्र शासनाने संकेतांक 202202221539561329 नुसार राज्याच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.