क्राईम

15 फेबु्वारी रोजी मारहाण झालेल्या युवकाचा मृत्यू ; खूनाचा गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-15 फेबु्रवारी रोजी रात्री एका युवकाला जबर मारहाण करून दुसऱ्या युवकाने त्यास शासकीय रुग्णालयात दाखल केले. 20 फेबु्रवारीच्या रात्री या जखमी युवकाचा मृत्यू झाल्यानंतर ज्या युवकाने त्यास दवाखान्यात भरती केले होते. त्यानेच खून केल्याची तक्रार मयत युवकाच्या भावाने दिली आहे. वजिराबाद पोलीसांनी आज दि.21 फेबु्रवारी रोजी हा गुन्हा दाखल केला आहे.
हरदिपसिंघ गुरूदेवसिंघ तिवाना यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा छोटा भाऊ विरसिंघ गुरुदेवसिंघ तिवाना हा जखमी अवस्थेत सरकारी रुग्णालयात असल्याची माहिती त्यांना 16 फेबु्रवारी रोजी सकाळी मिळाली. तेंव्हा ते दवाखान्यात गेले. विरसिंघला बोलता येत नव्हते अशी त्यांची अवस्था होती. दवाखान्यात आणणाऱ्याचे नाव शासकीय अभिलेखात नव्हते तर फक्त फोन नंबर होता. या नंबरची तपासणी हरदिपसिंघ यांनी केल्यानंतर हा नंबर जयमलसिंघ उर्फ गंगा हरबनसिंघ धारीवाले (20) याचा असल्याचे समजले. दरम्यान उपचार घेणाऱ्या विरसिंघने बोलता येत नसतांना इशाऱ्याने दाखवून मला दारु पाजवून मारले असे सांगितले. तेंव्हा हरदिपसिंघने गंगाने मारले काय अशी विचारणा केली असता विरसिंघने होकार दिला. उपचार सुरू असतांना विरसिंघकडे दवाखान्यात कोणी नाही म्हणून मी तक्रार देण्यासाठी येवू शकलो नाही असे फिर्यादीत लिहिलेले आहे. उपचारादरम्यान 20 फेबु्रवारी रोजी रात्री जखमी अवस्थेतील विरसिंघ गुरूदेवसिंघ तिवाना (20) यांचा मृत्यू झाला. विरसिंघच्या शरिरावर खंजीरचे अनेक वार करण्यात आलेले आहेत. त्यानंतर हरदिपसिंघने दिलेल्या तक्रारीनुसार वजिराबाद पोलीसांनी विरसिंघचा खून करणाऱ्या जयमलसिंघ उर्फ गंगा हरबनसिंघ धारीवाले (20) याच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 49/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 302 आणि भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 4/25 नुसार दाखल केला आहे. या खून प्रकरणाचा तपास पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पेालीस निरिक्षक शिवराज जमदडे आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार बबन बेडदे यांच्याकडे देण्यात आला आहे. वृत्तलिहिपर्यंत विरसिंघचा मारेकरी जयमलसिंघ उर्फ गंगा पोलीसांना सापडलेला नाही.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *