नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने एका चोरट्याला पकडून त्याच्याकडून 4 हजार रुपये किंमतीचा चोरलेला मोबाईल जप्त केला आहे. पुढील तपासासाठी चोरटा आणि चोरीचा मोबाईल शिवाजीनगर पोलीसांच्या स्वाधीन करून पुढील तपास करण्याची विनंती केली आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या आदेशाने पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार संजय केंद्रे, रुपेश दासरवाड, पद्मसिंह कांबळे, हनुमानसिंह ठाकूर हे 19 फेबु्रवारी रोजी सकाळी गावात गस्त करत असतांना देगलूर नाका परिसरात त्यांनी मोहम्मद अलताफ मोहम्मद इसाक पिंजारी (20) रा.मिल्लत्तनगर देगलूर नाका यास ताब्यात घेतले त्याने त्याच्याजवळ असलेल्या फोनबाबत समाधानकारक उत्तरे दिली नाहीत म्हणून त्यास कार्यालयात आणले अत्यंत विश्वासपुर्वक त्याची विचारणा केली असता हा मोबाईल चोरलेला असल्याचे सांगितले. पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे यांनी शिवाजीनगरच्या पोलीस निरिक्षकांना लिहिलेल्या पत्रानुसार चोरलेला मोबाईल आणि चोरणारा चोर मोहम्मद अलताफ मोहम्मद इसाक पिंजारी यास आपल्या ताब्यात देत आहोत याबद्दल पुढील कार्यवाही करावी.
