महाराष्ट्र

राज्यातील 13 सहाय्यक पोलीस निरिक्षकांना तदर्थ पदोन्नतीने पोलीस निरिक्षक पद; पोलीस महासंचालकांचे आदेश

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस दलाच्या सेवाकाळात आपले काम करतांना अनेक भानगडीपण होतात. या भानगडींमध्ये सेवा काळातील विविध फायदे रखडले जातात. यातून मार्ग काढत पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी औरंगाबाद येथील महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण यांच्या एका याचिकेला अनुसरुन राज्यातील 13 सहाय्यक पोलीस निरिक्षकांना तर्द्‌थ पण पदोन्नतीनंतर कोणतेही लाभ मिळणार नाही अशा प्रकारे पोलीस निरिक्षक पद बहाल केले आहे. यात नांदेड जिल्ह्यात कार्यरत दोन सहाय्यक पोलीस निरिक्षकांचा समावेश आहे.
शिस्तभंग विषयक, न्यायालयीन कार्यवाही यामुळे अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या रखडल्या जातात. सेवा ज्येष्ठता यादी आणि पदोन्नती नियमावली यात ज्या नियमांआधारे काम चालते त्या नियमांना काटेकोरपणे पालन करतांना अशा अनेक पदोन्नत्या रखडतात. त्यामुळे तर्द्‌थ पदोन्नती देण्यासाठी हा आदेश जारी करण्यात आला आहे. त्यांना पदोन्नती दिली तरी त्यांना पुढील पदाच्या सेवा ज्येष्ठता यादीमध्ये समावेश केला जाणार नाही. तसेच पदोन्नती मिळणारे कोणतेही फायदे त्यांना मिळणार नाहीत. महाराष्ट्र प्रशासकिय न्यायाधीकरण खंडपीठ औरंगाबाद येथे सुरू असलेल्या अर्ज क्रमांक 384/2019 या अर्जाला अनुसरुन, त्या अर्जातील आदेशांना बांधील राहुन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी राज्यातील 13 सहाय्यक पोलीस निरिक्षकांना तर्द्‌थ पदोन्नतीने पोलीस निरिक्षक बनवले आहे. त्यात नांदेड जिल्ह्यात कार्यरत दोन जणांचा समावेश आहे.
तदर्थ पदोन्नती प्राप्त करून सहाय्यक पोलीस निरिक्षक पदावरून पोलीस निरिक्षक पद देण्यात आलेले पोलीस अधिकारी पुढील प्रमाणे आहेत. त्या सर्वांच्या नियुक्त्या पदोन्नती देवून त्याच ठिकाणी करण्यात आल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील उस्माननगर पोलीस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानोबा अर्जुन देवकत्ते, नांदेड जिल्ह्यातील महिला सहाय्य कक्षात कार्यरत अशोक गणपत कोलते यांना पदोन्नती देण्यात आली आहे.राज्यातील तदर्थ पदोन्नती प्राप्त इतर पोलीस निरिक्षक पुढील प्रमाणे आहेत. विजय विष्णु पगारे-नाशिक शहर, वसंत लक्ष्मण पवार, मधुकर पांडूरंग यादव-मुंबई शहर, प्रमोद दिनकर पवार-नवी मुंबई, राजेंद्र तुकाराम हुलावळे-सिंधदुर्ग, सोमनाथ गोविंदराव खंदारे-लोहमार्ग मुंबई, योगेश आबासाहेब देशमुख, अरुण भिमराव देवकर-राज्य गुन्हे विभाग, विठ्ठल शिवाजीराव शिंगटे-पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ मुंबई, शांतीकुमार रावसो पाटील-बुलढाणा.
नांदेडच्या पोलीस अंमलदाराची तदर्थ पदोन्नती मागणी
पोलीस अधिकाऱ्यांच्या तदर्थ पदोन्नतीचे आदेश पोलीस महासंचालकांनी निर्गमित केले आहेत. पण सन 2017 मध्ये झालेल्या एका शासन निर्णयाचा आधार घेवून नांदेडच्या पोलीस हवालदार 1528 यांनी पोलीस अधिक्षक नांदेड यांना 3 फेबु्रवारी 2022 रोजी पाठवलेल्या पत्रानुसार तदर्थ पदोन्नती देवून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पद देण्याची मागणी केली आहे. न्यायालयीन कार्यवाहीच्या अधीन राहुन दिली जाणारी तदर्थ पदोन्नती केवळ तात्पुर्ती असते. त्यामुळे कोणतेही नियमित लाभ, सेवाजेष्ठता मिळणार नाही हेही मला मान्य आहे. तेंव्हा मला तदर्थ पदोन्नती देवून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक हे पद द्यावे अशी मागणी नासेर अली खान जब्बार खान पठाण, पोलीस हवालदार 1528 नेमणूक पोलीस मुख्यालय नांदेड यांनी केली आहे. या अर्जावर पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला आहे की, नाही याची माहिती प्राप्त झाली नाही.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.