नांदेड(प्रतिनिधी)-दोन जणांनी पिस्तुलचा धाक दाखवून 1 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याची तक्रारी एका कंत्राटदाराने केली आहे.
कंत्राटदार विशाल रमेशराव सुर्यवंशी रा.सहयोगनगर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 15 फेबु्रवारी रोजी सकाळी 6.30 ते 7 वाजेदरम्यान सहयोगनगर भागात मुकेश उर्फ ऋतीक सुर्यवंशी आणि रोहित विजय सुर्यवंशी या दोघांनी त्यांना गाठले आणि 1 लाख रुपयांची खंडणी दे नाही तर तुला जीवे मारतो अशी धमकी दिली. या प्रसंगी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून त्यांच्या कुटूंबियांचा उध्दार केला. फिर्यादी विशाल सुर्यवंशीच्या मोबाईल क्रमांकावर मुकेश उर्फ ऋतीक सुर्यवंशीने व्हॉटसऍप क्रमांकावरून त्यांच्या कुटूंबातील महिलांविरुध्द अश्लील भाषेत संदेश पाठवले तसेच फेसबुकवरून सुध्दा असेच कांही संदेश पाठवले. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा क्रमांक 57/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 384, 294, 323, 506 आणि 34 सह भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 3/25 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक संजय ननवरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक मुंडे यांच्याकडे देण्यात आला आहे.