नांदेड

कोरोना समाप्तीकडे; नवीन रुग्ण 08; सुट्टी 57 जणांना;मृत्यू नाही;गंभीर रुग्ण 04

नांदेड,(प्रतिनिधी)- आज कोरोना विषाणूने एकूण 08 नवीन कोरोना बाधीत रुग्ण दिले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 188 आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी 97.19 झाली आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहिती नुसार आज दि.17 फेबु्रवारी रोजी कोरोना बाधेने कोणाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.आज 08 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत.
नांदेड मनपा विलगिकरणातून-32,सरकारी रुग्णालय विष्णुपुरी-02, तालुक्यातील गृह विलगीकरण-18,खाजगी रुग्णालय -05अश्या 57 रुग्णांना उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 99832 झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण 97.19 टक्के आहे.
आज सापडलेले कोरोना रुग्ण नांदेड मनपा-02, मुखेड-01,किनवट-01, लोहा-01, धर्माबाद-01, अर्धापूर-02 असे आहेत.
आज 1466 अहवालांमध्ये 1441 निगेटिव्ह आणि 08 पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 102708 झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत 06 आणि 02 अँटीजेन तपासणीत असे एकूण 08 रुग्ण नवीन सापडले आहेत. आज स्वॅब तपासणी 00 अहवाल प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब 11 आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब 03 आहेत.
आज कोरोनाचे ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -140, नांदेड जिल्हाच्या तालुक्यातील विलगीकरण-36,सरकारी रुग्णालय -07, खाजगी रुग्णालयात- 05, असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात 04 रुग्ण आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.