क्राईम

एका आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-राजेशनगर भागात गळफास घेवून आत्महत्या करणाऱ्या 37 वर्षीय व्यक्तीच्या मृत्यू संदर्भाने भाग्यनगर पोलीसांनी उमरखेड येथील 5 जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

रंजना अमोल यादव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा भाऊ संदीपान रामकिशन खंदारे (37) यास उमरखेड येथील स्नेहल आनंदराव गायकवाड, गोदावरी आनंदराव गायकवाड, आनंदराव बेघाजी गायकवाड, प्रथमेश आनंदराव गायकवाड, नम्रता आनंदराव गायकवाड या पाच जणांनी किरकोळ कारणांवरुन मारहाण केली, त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे संदीपान खंदारेंनी गळफास घेवून मरण पावले आहेत. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा क्रमांक 55/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 306, 504, 506 आणि 34 नुसार दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक मुंढे यांच्याकडे देण्यात आला आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.