नांदेड (प्रतिनिधी)- अधिक विलंब झाल्यास कर्णबधिरपणा कायमचा राहतो या साठी शोध घेवून वेळीच उपचार केल्यास बालकाच्या बहिरेपणावर मात करता येते असे प्रतिपादन जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी-वर्षा ठाकुर-घुगे यांनी केले आहे.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त जिल्हा परिषद,सुनो प्रकल्प व लायन्स क्लबच्या वतीने वजीराबाद येथील लायन्स स्पीच अँड हियरिंग सेंटर येथे कानाच्या विशेष मोहिमेअंतर्गत बेरा तपासणीचे आयोजन करण्यात आलेआहे.
यावेळी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी-वर्षा ठाकुर-घुगे बोलत होत्या या प्रसंगी शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर, जि.प.चे आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे,शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उपशिक्षणाधिकारी अमदूरकर, अर्धापूरचे गट विकास अधिकारी एस. कार्तिकेयन, हर्षद शहा, अरुण तोष्णीवाल,प्रफुल्ल अग्रवाल, शिवानंद टाक, मोतीलाल जांगीड, रमेश सारडा, केशव गड्डम सर, दिपक रंगनाणी आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी-वर्षा ठाकुर-घुगे म्हणाल्या की गत तिन महिन्यापासून या प्रकल्पाअंतर्गत कर्णबधिर बालकांचा शोध घेण्यात येत आहे.यासाठी अंगणवाडी ताई,आशाताई,आरोग्य विभाग परिश्रम घेत आहेत.या मोहिमेद्वारे ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न आहे.प्रत्येक 1000 जन्मलेल्या बाळामध्ये 6 ते 11 बालके कर्णदोष असलेले आढळतात.ह्या मुलांचा कर्णदोष मुकबधीरतामुळे सर्वांगीण विकासात व व्यक्तिमत्वात बाधा येते.त्यामुळे योग्य वेळेस निदान होणे अत्यंत आवश्यक आहे.समाजामध्ये जन्मतच बालकातील कर्णदोषाबद्दल विशेष ज्ञान व जागरूकता नसल्याने कर्णदोष बाधित मुले पुढे मुकबधीर होतात. निदानानंतर योग्य उपचाराचे नियोजन करण्यात आले आहे. कर्णबधीरता हा समाजातील व्यंगत्व दूर करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे असे आवाहन सौ. वर्षा ठाकुर-घुगे यांनी केले.
बहिरेपणा हा कायम राहतो असा अनेकांचा समज आहे.मात्र हा समज चुकीचा आहे.विज्ञान,तंत्रज्ञान आता खूप पुढे गेले आहे.लहानपणी वेळीच बालकाचा शोध घेवून कर्णबधिरपणावर योग्य उपचार केल्यास बहिरेपणा कायमचा दूर होतो.या मोहिमेद्वारे अर्धापूर तालुक्यातील 109 लहान बालकामध्ये कर्णदोष आढळल्यानंतर त्यांना नांदेडमध्ये लायन्स स्पीच अँड हियरिंग सेंटर येथे पुढील OAE,BERA टेस्ट साठी आणण्यात येते. अर्धापूर तालुक्यातील प्रत्येक गावातील मुलांना RBSK Team द्वारे मुलांना सेंटर मध्ये नेवून त्या मुलांची तपासणी व निदान करण्याचे जातीने लक्षं सौ. वर्षा ठाकुर-घुगे यांनी दिले आहे. या मोहिमेच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याचा आपला प्रयत्न आहे.यासाठी सांघिक प्रयत्न झाल्यास आपण निश्चित ही मोहीम यशस्वी पार पाडू असा विश्वास सौ. वर्षा ठाकुर-घुगे यांनी व्यक्त केला आहे.
या वेळी अन्य मान्यवरांनीही आपले विचार मांडले .प्रास्ताविक डॉ.लक्ष्मीकांत बजाज यांनी या मोहिमेबाबतची माहिती दिली.सूत्रसंचलन व उपस्थितांचे आभार डॉ. सौ. अर्चना बजाज यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी,RBSKY चे अनिल कांबळे,मुरलीधर गोडबोले,शशिकांत पांपटवार,ऑडिओलोजीस्ट बालाजी देवकते,सौ.सुनीता सुरनर,श्री व सौ. डॉ.टाक आदींनी परिश्रम घेतले.