जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहिती नुसार आज कोरोना बाधेने कोणाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.आज १५ नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत.
नांदेड मनपा विलगिकरणातून-१०,सरकारी रुग्णालय विष्णुपुरी-०५, तालुक्यातील गृह विलगीकरण-०५,अश्या २३ रुग्णांना उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९९७७५ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९७.२५ टक्के आहे.
आज सापडलेले कोरोना रुग्ण नांदेड मनपा-०९,हदगाव-०१, नायगाव-०२,मुखेड-०१, नांदेड ग्रामीण-०१,कंधार-०१,असे आहेत.
आज कोरोनाचे १३३ ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -६०, नांदेड जिल्हाच्या तालुक्यातील विलगीकरण-५४,सरकारी रुग्णालय -०९, खाजगी रुग्णालयात- १०, असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात ०५ रुग्ण आहेत.