तीन दुचाकी गाड्यांची चोरी
नांदेड(प्रतिनिधी)-डी मार्ट समोर दुचाकीवर जाणाऱ्या एका 32 वर्षीय महिलेचे 72 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण तोडून चोरट्यांनी पळ काढला आहे. नवोदय हॉस्पीटल तरोडा, आसना नदीच्या पुलाजवळ आणि नटराज हॉटेल मिल रोड येथून 1 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या तीन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत.
गिताई अमोल जाधव रा.कॅनल रोड व्यंकटेशनगर नांदेड या महिला 13 फेबु्रवारी रोजी रात्री 9 वाजता डी मार्टसमोरून स्वामी समर्थ केंद्रातून दर्शन घेवून घराकडे आपल्या दुचाकी क्रमांक एम.एच.26 बी.एस.1746 वर बसून घराकडे जात असतांना कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या पाठीमागून घेवून दुचाकीवरच्या पाठीमागील माणसाने त्यांच्या गळ्यातील 16 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण 72 हजार रुपये किंमतीचे बळजबरीने चोरून नेले आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक सुनिल भिसे अधिक तपास करीत आहेत.
किशोर शिवाजी गवळे यांनी नवोदय हॉस्पीटल तरोडा नाका येथे उभी केलेली आपली 50 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.टी.1244 ही 8 जानेवारीच्या दुपारी 2 वाजता चोरीला गेली. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार जाधव अधिक तपास करीत आहेत.
शंकर रामकिशन डोंगरे यांनी आपली 65 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 टी.6866 ही 14 फेबु्रवारी रोजी मध्यरात्री 2 वाजता आसना पुलाजवळून चोरीला गेली. त्यावेळी ते नैसर्गिक विधीसाठी उभे होते. तेंव्हा 4 जणांनी ही गाडी चोरून नेली आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार कानगुले अधिक तपास करीत आहेत.
मिल रोड नटराज हॉटेलसमोरून दि.2 फेबु्रवारीच्या रात्री 8 वाजता गोपीनाथ व्यंकटी राऊतवाड यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ई.6413 ही 15 हजार रुपये किंमतीची गाडी चोरीला गेली आहे. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार राठोड अधिक तपास करीत आहेत.
