नांदेड(प्रतिनिधी)-संपानंतर सुरू झालेल्या लालपरी अर्थात एस.टी.बसवर होणारी दगडफेक ही आजही सहज भावाने घेतली जात आहे. खरे तर या मागचे कटकारस्थान प्रशासनाने सोडून काढायला हवे. असाच एक प्रकार 14 फेबु्रवारीला दुपारी कारेगाव बसस्थानक ता.लोहा येथे घडला आहे.
एस.टी.महामंडळाचे बस चालक कंधार आगारात कार्यरत श्रीराम हौसाजी कागणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 14 फेबु्रवारी रोजी दुपारी 3 वाजेच्यासुमारास ते एस.टी.गाडी क्रमांक एम.एच.26 ए.ए.8833 घेवून नांदेड ते लोहा असा प्रवास करत असतांना कारेगाव बसस्थानकाजवळ त्यांच्या एस.टी.पुढे एक दुचाकी आडवी लावली. त्यामुळे बसला थांबावे लागले. त्या दुचाकीवरील पृथ्वीराज राजूसिंह ठाकूर आणि बाळू चुडावकर या दोन युवकांनी एस.टी.वर दगड फेकून एस.टी.चे काच फोडले ज्यामुळे एस.टी.चे दोन हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. लोहा पोलीसांनी याबाबत गुन्हा क्रमांक 35 /2022 दाखल केला आहे. या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेची कलमे 353, 341, 332, 336, 504 आणि 34 सह सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा कलम 3 जोडण्यात आली आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक मारोती सोनकांबळे यांच्याकडे देण्यात आला आहे.
एस.टी.बसवर होणारी दगडफेक आज सहज घेतली जात आहे. पण एस.टी. कर्मचाऱ्यांनी केलेला संप आता कुठे तरी अर्धवट मोडीत निघाल्यानंतर एस.टी. गाड्या रस्त्यावर धावू लागल्या आहेत.त्यामुळे एस.टी.बसेसवर होणारी दगडफेक ही मोठे खलतब असू शकते याचा शोध प्रशासनाने घेवून या खलबतामागे मुळ धागा कोणता आहे तो शोधण्याची गरज आहे.
