नांदेड-17, लातूर -11, परभणी -6 आणि हिंगोली-4
नांदेड(प्रतिनिधी)-राज्यातील 850 पोलीस उपनिरिक्षकांना सहाय्यक पोलीस निरिक्षक पदावर पदोन्नती देवून संवर्ग वाटपासाठी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या मंजुरीनंतर अस्थापना विभागाचे अपर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंगल यांनी अधिसुचना जारी केली आहे. या 850 पोलीस उपनिरिक्षकांमध्ये नांदेड पोलीस परिक्षेत्रातील नांदेड-17, लातूर -11, परभणी -6 आणि हिंगोली-4 असे एकूण 38 पोलीस उपनिरिक्षक आहेत.
पोलीस महासंचालक कार्यालयातून जारी झालेल्या अधिसुचनेनुसार राज्यातील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पदासाठी पदोन्नती देणे आहे. राज्यातील 850 पोलीस उपनिरिक्षक यासाठी पात्र आहेत. राज्यात नागपुर विभाग-89, अमरावती-34, औरंगाबाद-42, कोकण-1-5, कोकण-2-38, नाशिक-18, पुणे-79 आणि इतर विभागांचे मिळून 599 अशी पदे रिक्त आहेत. त्यासाठी राज्यातील 850 पोलीस उपनिरिक्षकांकडून बंद पत्र लिहुन घ्या आणि ते पोलीस महासंचालक कार्यालयास पाठवा असे आदेश देण्यात आले आहेत.
नांदेड पोलीस परिक्षेत्रातील नांदेड जिल्ह्यातील सुरेश कचरु नरवडे, अमोल पंढरी पन्हाळकर, नागनाथ गुरबसापा सांगळे, संदीप बाबूराव थडवे, रुपाली गौतम कांबळे, भावेश्र्वर रामचंद्र जाकीकोेरे, बाबासाहेब पराजी थोरे, जावेद शब्बीर शेख, अनिता विठ्ठलराव दिनकर, दिपक कल्याणराव फोलाणे, ज्ञानोबा त्र्यंबक मुलगिर, महेश कल्याणसिंह ठाकूर, गोविंद विठ्ठलराव खैरे, सौमित्रा रामराव मुंडे, गणेश हरीशचंद्र होळकर, शिवराज बाबूराव थडवे, शेख नवाज जमालसा यांची नावे आहेत. लातूर जिल्ह्यातील किशन सुरेश पठारे, कल्याण भास्कर नेहरकर, सहदेव बाबासाहेब खेडकर, धनंजय फुलचंद जाधव, गजानन अशोकराव पाटील, गणेश प्रभाकर गायके, सुदर्शन मोहन सुर्वे, रणजितसिंह राजेंद्रसिंह काथवटे, मलय्या चंद्रशेखर स्वामी, बालाजी माणिक पल्लेवाड, निलम मिठू घोरपडे यांची नावे आहेत. परभणी जिल्ह्यातील सचिन गंगाराम द्रोणाचार्य, प्रदीप गोपाळराव अलापूरकर,संजय महादेव गिते, मनिषा संजय पवार, पंडीत गणपतराव शिरसे, संतोष आबाजी शिरसेवाड यांची नावे आहेत. हिंगोली जिल्ह्यातील पोलीस उपनिरिक्षक नितीन गोविंदराव केनेकर, शिवसांब सुर्यकांत घेवारे, गणेश शेषराव राठोड, ज्ञानेश्र्वर पांडूरंग शिंदे यंाची नावे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पदाची पदोन्नती प्राप्त करणाऱ्या यादीत आहेत.