नांदेड

कोरोना बातमी;शनिवारी एक मृत्यू;रुग्ण संख्या फक्त ३२; सुट्टी ८० जणांना

नांदेड,(प्रतिनिधी)- आज कोरोना विषाणूने एक पुरुष रुग्णाला मृत्यू दिला आहे.शनिवारी कोरोना विषाणूने एकूण ३२ नवीन कोरोना बाधीत रुग्ण दिले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १९५ आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी ९७.२८ झाली आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी कोरोना बाधेने एक पुरुष रुग्णांचा मृत्यू झाला आहे.आज ३४ नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत.

कोरोना मुळे खाजगी रुग्णालयात पालम,परभणी येथील पुरुष वय ७५ यांचा मृत्यू कोरोना बाधेने झाला आहे.

नांदेड मनपा विलगिकरणातून-३०,खाजगी रुग्णालय-०३, तालुक्यातील गृह विलगीकरण-४०,सरकारी रुग्णालय विष्णुपुरी-०५,देगलूर-०२,अश्या ८० रुग्णांना उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९९६३३ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९७.२८ टक्के आहे.

आज सापडलेले कोरोना रुग्ण नांदेड मनपा-१६, लोहा-०१, मुखेड-०४,किनवट-०४,नांदेड ग्रामीण-०१, धर्माबाद-०१, परभणी-०१, हिंगोली-०१, हिमायतनगर-०१,भोकर-०१, यवतमाळ-०१,असे आहेत.

आज १२०५ अहवालांमध्ये ११४६ निगेटिव्ह आणि ३२ पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या १०२५१६ झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत २९ आणि ०३ अँटीजेन तपासणीत असे एकूण ३४ रुग्ण नवीन सापडले आहेत. आज स्वॅब तपासणी अहवाल ०० प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब २४ आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ०० आहेत.

आज कोरोनाचे १९५ ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -९८, नांदेड जिल्हाच्या तालुक्यातील विलगीकरण-६५,सरकारी रुग्णालय -१६, खाजगी रुग्णालयात- १९, असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात ०५ रुग्ण आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.