नांदेड(प्रतिनिधी)-अमरावती मनपा आयुक्तांवर झालेल्या हल्याचा निषेध नांदेड महानगरपालिकेतील अधिकारी आणि व कर्मचारी आज महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर व्यक्त केला.
अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.प्रविण श्रीराम आष्टीकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्याचा निषेध करतांना आज मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त अजितपालसिंघ संधू, शुभम क्यातमवार, डॉ.पंजाबराव खानसोळे, मुख्य लेखाधिकारी अश्विनी नराजे, लेखाधिकारी शोभा मुंडे यांच्यासह सर्व विभागातील प्रमुख मनपाच्या मुख्यद्वारावर हजर होते. या भ्याड हल्याचा निषेध म्हणून लेखणी बंद आंदोलन करण्यात आले. हल्लेखोरांवर कडक कार्यवाही व्हावी, अशी मागणी करण्यात आली. याबाबत आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांनी एका शिष्टमंडळासह जावून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
