नांदेड

जनता अध्यापक महाविद्यालयाने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याला प्रवेश नाकारला

नांदेड(प्रतिनिधी)-राज्य सामाईक प्रवेश प्रक्रिया (सीईटी) परिक्षा उत्तीर्ण झालेल्या आणि प्रवेशास पात्र असलेल्या एका विद्यार्थ्याला जनता अध्यापक महाविद्यालयाने तु अनूचित जातीचा विद्यार्थी आहेस तुला खुल्या प्रवर्गातून प्रवेश पाहिजे असेल तर दोन वर्षाचे 1 लाख रुपये भरावे लागतील असे सांगितल्याने पीडीत विद्यार्थ्याने याबाबतची तक्रार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूकडे केली आहे.
गजेंद्र सोनबा टोम्पे या विद्यार्थ्याने अध्यापक महाविद्यालयातील प्रवेशासाठी शैक्षणिक वर्ष 2021-2022 मध्ये राज्य सामाईक प्रवेश परिक्षा कक्ष, महाराष्ट्र यांच्याकडून घेण्यात आलेल्या बी.एड्‌ सीईटी परिक्षा उत्तीर्ण केली. त्यात त्यांना 67 टक्के गुण प्राप्त झाले. दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये गजेंद्र सोनबा टोम्पे यांचा क्रमांक महाविर सोसायटी येथील जनता अध्यापक महाविद्यालय येथे गुणानूक्रमे 8 व्या क्रमांकावर आला. त्यांना मिळालेला हा प्रवेश त्यांच्या गुणवत्तेवर आधारीत आहे. सीईटीचे प्रवेश पत्र मिळाले तेंव्हा गजेंद्र टोम्पे 8 फेबु्रवारी ते 11 फेबु्रवारी दरम्यान प्रवेश घ्यायचा होता. 8 फेबु्रवारी दुपारी 12 वाजता ते प्रवेश घेण्यासाठी गेले असता जनता अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्याने तु अनुसूचित जातीचा विद्यार्थी आहे आणि तुला खुल्या प्रवर्गाच्या जागेतून प्रवेश घ्यायचा असेल तर प्रत्येक वर्षाचे 50 हजार, अर्थात दोन वर्षाचे 1 लाख रुपये भरावे लागतील असे सांगण्यात आले.
यावर गजेंद्र टोम्पे यांनी शासकीय प्रवेश फि परिष्ठ प्राचार्यांना दाखवले तेंव्हा तु हुज्जत घालू नकोस तुला प्रवेश मिळणार नाही असे प्राचार्यांनी सांगितले. 9 फेबु्रवारी रोजी पुन्हा गजेंद्र टोम्पे जतना अध्यापक महाविद्यालयात गेले त्यावेळी तर उध्दटपणे आरोप लावून त्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. या सर्व घटनेवर गजेंद्र टोम्पे यांनी आपली व्यथा एका अर्जाद्वारे 10 फेबु्रवारी रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड्याच्या कुलगुरूसक्षम मांडली आहे आणि आपल्याला प्रवेश मिळवून देण्याची विनंती केली आहे. उद्या दि.11 फेबु्रवारी हा गजेंद्र टोम्पेला प्रवेश घेण्यासाठीचा शेवटचा दिवस आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.