विशेष

पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या तत्परतेने न्याय मिळाला

पोलीस उपनिरिक्षक उत्तम वरपडे पाटील यांच्या बॅंक खात्यातून 96 हजार रुपये गायब झाले होते
नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीस ठाण्यातील दबंग पोलीस उपनिरिक्षक उत्तम वरपडे पाटील यांच्या बॅंक खात्यातून 96 हजारांची ऑनलाईन फसवणूक झाली. पण वजिराबाद पोलीसांनी केलेल्या त्वरीत हालचालीमुळे ठकसेनाने 24 तासात 96 हजार रुपये परत उत्तम वरपडे पाटील यांच्या खात्यात पाठवले आहेत.
पोलीस उपनिरिक्षक उत्तम वरपडे पाटील यांचे पुत्र साई उत्तमराव वरपडे पाटील यांनी दि.6 फेबु्रवारी रोजी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी ऑनलाईन पध्दतीने मागवलेले कांही साहित्ये अपूर्ण पध्दतीचे आले. त्याबाबत सायंकाळी 4.25 वाजता त्या डिलेव्हरी बॉयला सांगितल्यानंतर त्याने कंपनीच्या कस्टमअर केअर विभागाचा नंबर दिला. त्याने वेगळाच नंबर दिला आणि त्यावर उत्तम वरपडे पाटील यांच्या फोनवरून साईप्रसाद वरपडेने कॉल केला. कॉल केल्यावर गोड-गोड बोलून त्या ठकसेनांनी उत्तम शंकरराव वरपडे पाटील यांच्या कर्नाटक बॅंक खात्यातून 96 हजार रुपये काढून घेतले. या गुन्ह्यामध्ये ठकबाजी करणारा हा 916294566769 या नंबरचा धारक आहे. वजिराबाद पोलीसांनी या बाबत गुन्हा क्रमांक 29/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 420 सह तंत्रज्ञान कायद्यानुसार दाखल केला्र. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक दत्तात्रय निकम यांच्याकडे देण्यात आला. वजिराबाद पोलीसांनी केलेल्या त्वरीत हालचालीचा परिणाम झाला आणि आज दि.7 फेबु्रवारी रोजी ठकबाजी करणाऱ्या भामट्याने उत्तम शंकरराव वरपडे पाटील यांच्या बॅंक खात्यात 96 हजार रुपये जमा केले आहेत. आज उत्तम वरपडे पाटील यांनी सांगितले की, पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात मला 24 तासात न्याय मिळाला. गुन्ह्याचे तपासीक अंमलदार पोलीस निरिक्षक दत्तात्रय निकम, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक शिंगे, शुभांगी कोरेगावे, शरदचंद्र चवरे, सायबर विभागाचे पोलीस उपनिरिक्षक दळवी, पोलीस कर्मचारी राठोड यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे मला न्याय मिळाला आहे. पोलीस उपनिरिक्षक उत्तम वरपडे पाटील यांच्या प्रकरणात पोलीसांनी दाखवलेली तत्परता सर्वसामान्य माणसाच्या कामात सुध्दा दाखवावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.