सामाजिक कार्यकर्ते क्षितिज जाधव यांचा उपक्रम
नांदेड (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते क्षितिज जाधव यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त वृत्तपत्र विक्रेत्यांना उबदार कानटोपीचे वाटप केले. क्षितिज जाधव यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले आहे.
येथील सामाजिक कार्यकर्ते तथा खा. प्रताप पाटील चिखलीकर यांचे कट्टर समर्थक क्षितिज जाधव हे महापुरुषांची जयंती तसेच मुलाच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवित असतात. आज दि.3 फेब्रुवारी रोजी मुलगा ध्रुवीज याच्या तिसर्या वाढदिवसानिमित्त ऊन, पाऊस, थंडी आदी कशाचीही तमा न बाळगता वाचकांपर्यंत वृत्तपत्र पोहचविणार्या सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांना उबदार टोपीचे वाटप केले. विसावा उद्यान परिसरात पहाटेच्या वेळी झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमास सिद्धार्थ गायकवाड, सचिन वाघमारे, वृत्तपत्र वितरक संघटनेचे बालाजी पवार, चंद्रकांत घाटोळ, पत्रकार सुरेश काशीदे, पप्पू कोल्हे, अजय गवळी, अमोल गोधने यांची उपस्थिती होती.
सामाजिक कार्यकर्ते क्षितिज जाधव यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे तर वृत्तपत्र विक्रेत्यांनी त्यांचे आभार मानले.